मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray :” मुलं पळवणारी टोळी पाहिली मात्र बाप पळवणारी औलाद राज्यात”, बंडखोराना टोला

Uddhav Thackeray :” मुलं पळवणारी टोळी पाहिली मात्र बाप पळवणारी औलाद राज्यात”, बंडखोराना टोला

Sep 21, 2022, 08:05 PM IST

    • मुंबई महापालिका निवडणूक आणि शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज मुंबईतील शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा घेतला. यामध्ये ठाकरेंनी बंडखोरांबरोबरच भाजप व मोदी-शहांवर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे

मुंबई महापालिका निवडणूक आणि शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनीआज मुंबईतील शिवसेना गटप्रमुखांचा मेळावाघेतला. यामध्ये ठाकरेंनी बंडखोरांबरोबरच भाजप व मोदी-शहांवर हल्लाबोल केला.

    • मुंबई महापालिका निवडणूक आणि शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज मुंबईतील शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा घेतला. यामध्ये ठाकरेंनी बंडखोरांबरोबरच भाजप व मोदी-शहांवर हल्लाबोल केला.

Shiv sena uddhav Thackeray address : मुंबई  महापालिका निवडणूक आणि शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज मुंबईतील शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भाषणांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी करत बंडखोर व भाजपवर तोंडसुख घेतले. 

ट्रेंडिंग न्यूज

PDCC Bank : बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

Jalgaon Accident: जळगावमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, भीषण अपघातात महिलेसह तीन मुलांचा मृत्यू

Lok Sabha Election : राज्यात दोन ठिकाणी मतदान केंद्राबाहेरील रांगेतच दोघांनी सोडला जीव, नेमकं काय झालं?

Kolhapur News : धुणं धुण्यासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला! हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना

गटप्रमुखांच्या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीचे (BMC Election) रणशिंग फुंकले आहे. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात हा मेळावा पार पडला. 

LIVE UPDATE -

 

  • हिंमत असेल तर महिनाभरात मुंबई महापालिकेची व विधानसभेची निवडणूक घेऊन दाखला, उद्धव ठाकरेंचा अमित शहा यांना आव्हान
  • मुंबईतील मुस्लिम, गुजराती, उत्तर भारतीय आमच्यासोबत आहेत. कारण कोरोना काळात मी कोणताही भेदभाव न करता त्यांचे प्राण वाचवले.
  • आपल्या आयुष्यातील पहिली निवडणूक असल्यासारखी मेहनत घ्या. केलेल्या कामांची जनतेला माहिती करून द्या -उद्धव ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना साद

 - ज्या महिलेवर तुमच्या पक्षातील नेत्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. संपूर्ण देशात कोट्यवधी महिलांमध्ये पंतप्रधानांना हीच महिला राखी बांधायला मिळाली, उद्धव यांचा भावना गवळींना टोला

  • दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ अशी मिंधे गटाची अवस्था आहे. मुंबई  हे देशाच आर्थिक केंद्र आणि आणि तेथून तुम्ही आर्थिक केंद्रच पळवता? वेदांता जर परत येत असेल तर आम्ही तुमच्यासोबत येऊ. सरकार व विरोधक एकत्र येऊन काम करू.
  • २५  वर्ष युतीत आमची सडली, कुजली. ही माझी आजही भूमिका आहे. ही सगळी नालायक माणसं आपण जोपासली. विनासायास यांना उपमहापौर पद मिळालं. मेहनत करायची शिवसैनिकांनी आणि सत्ता त्यांनी उपभोगायची.
  • वंशवाद म्हणजे काय? मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे... तुमचा वंश कुठला? सगळे बाहेरचे बावनकुळे का एकशे बावनकुळे हे माहित नाही. तुमचा वंश कुठला? असा सवाल उद्धव ठाकरेंनी या वेळी उपस्थित केला आहे.
  • मुंबईचे लचके तोडणाऱ्या गिधाडांना फिरकू देऊ नका. शिवाजी महाराजांच्या काळात देखील आदिल शहा, हे शहा, ते शहा असे अनेक चाल करून आलेले... आताही त्या कुळातील येऊन गेले.
  • अमित शाह म्हणाले, शिवसेनेला जमीन दाखवा. तुम्हीं प्रयत्न कराच, तुम्हाला आम्हीं आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही
  • मुले पळवणारी टोळी पाहिली पण बाप पळवणारी औलाद पहिल्यांदाच राज्यात फैलावतेय - उद्धव ठाकरे

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा