मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai water cut : मुंबईकरांसाठी खुशखबर..! २३ एप्रिलपासून पाणीकपात मागे, जल बोगद्याची विक्रमी वेळेत दुरुस्ती

Mumbai water cut : मुंबईकरांसाठी खुशखबर..! २३ एप्रिलपासून पाणीकपात मागे, जल बोगद्याची विक्रमी वेळेत दुरुस्ती

Apr 18, 2023, 10:23 PM IST

  • Mumbai water cut : मागील १५ दिवसांपासून पाणीकपातीला सामोरे जाणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे महिनाभरासाठी असलेली पाणीकपात मुदतीआधीच मागे घेण्यात आली आहे. मुंबईतील पाणीपुरवठा २३ एप्रिलपासून पूर्ववत होणार आहे.

Mumbai water cut news

Mumbai water cut : मागील १५ दिवसांपासून पाणीकपातीला सामोरे जाणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे महिनाभरासाठी असलेली पाणीकपात मुदतीआधीच मागे घेण्यात आली आहे.मुंबईतील पाणीपुरवठा २३ एप्रिलपासूनपूर्ववत होणार आहे.

  • Mumbai water cut : मागील १५ दिवसांपासून पाणीकपातीला सामोरे जाणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे महिनाभरासाठी असलेली पाणीकपात मुदतीआधीच मागे घेण्यात आली आहे. मुंबईतील पाणीपुरवठा २३ एप्रिलपासून पूर्ववत होणार आहे.

Mumbai Water Cut : मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी भांडुप संकुलापर्यंत पाणी आणणाऱ्या जलबोगद्याची गळती दुरुस्ती करण्याचे आव्हानात्मक काम बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाने नियोजित ३० दिवसांऐवजी अवघ्या १८ दिवसात पूर्ण केले आहे. यामुळे मागील १५ दिवसांपासून पाणीकपातीला सामोरे जाणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे महिनाभरासाठी असलेली पाणीकपात मुदतीआधीच मागे घेण्यात आली आहे. मुंबईतील पाणीपुरवठा २३ एप्रिलपासूनपूर्ववत होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

PDCC Bank : बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

Jalgaon Accident: जळगावमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, भीषण अपघातात महिलेसह तीन मुलांचा मृत्यू

Lok Sabha Election : राज्यात दोन ठिकाणी मतदान केंद्राबाहेरील रांगेतच दोघांनी सोडला जीव, नेमकं काय झालं?

Kolhapur News : धुणं धुण्यासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला! हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना

गुंदवली ते भांडुप संकूल दरम्यानच्या जल बोगद्याच्या दुरुस्तीचे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यासाठी भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे झालेली गळती दुरुस्ती करण्याचे आव्हानात्मक काम मुंबई महानगरपालिकेच्‍या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाने ३० दिवसांऐवजी १८ दिवसात पूर्ण केले. आता हा जलबोगदा पूर्ण क्षमतेने भरुन कार्यान्वित करण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रविवार, दिनांक २३ एप्रिल २०२३ पासून मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याचे मुंबई महापालिकेने दिली आहे.

ठाणे येथे कूपनलिकेचे (बोअरवेल) खोदकाम सुरू असताना बोगद्याला हानी पोहोचून पाणी गळती सुरू झाली होती. या दुरुस्तीसाठी जलबोगदा ३१ मार्च २०२३ पासून बंद केला होता. तसेच,३१ मार्च २०२३ पासून दुरुस्‍तीचे काम पूर्ण होईपर्यंत अंदाजे ३० दिवसांसाठी १५ टक्‍के पाणी कपात लागू होती.जलबोगद्याला ठाणे येथे झालेली गळती दुरुस्ती करण्याचे आव्हानात्मक काम मुंबई महानगरपालिकेच्‍या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाने १८ दिवसात पूर्ण केले. आता हा जलबोगदा पूर्ण क्षमतेने भरुन कार्यान्वित करण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रविवार, दिनांक २३ एप्रिल २०२३ पासून मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

हा जलबोगदा जमिनीपासून सुमारे १०० ते १२५ मीटर खोलवर आहे. हानी पोहचल्याचे ठिकाण भांडुप संकुल झडप (शाफ्ट) पासून सुमारे ४.२ किलोमीटर अंतरावर होते.दुरुस्ती पूर्ण केल्यानंतर आता हा जल बोगदा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यापूर्वी पाण्याने भरून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जल अभियंता विभागातर्फे उद्या (बुधवार) १९ एप्रिल २०२३ पासून आवश्यक त्या झडपांच्‍या प्रचलनास तातडीने सुरूवात करण्यात येणार आहे. जल बोगदा पाण्याने भरून घेण्यासाठी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता आहे.

या अतिरिक्त पाण्याची पूर्तता करताना सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होणार नाही, याची देखील प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. उद्या दिनांक १९ एप्रिल २०२३ पासून झडपांच्‍या प्रचलनास सुरूवात होणार आहे. बोगदा पाण्याने पूर्ण भरुन कार्यान्वित होण्यासाठी आणखी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा