मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 19 December 2022 Live : Winter Assembly Session : विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित
Maharashtra Assembly Winter Session (HT)

Marathi News 19 December 2022 Live : Winter Assembly Session : विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित

Dec 19, 2022, 05:36 PMIST

Maharashtra Assembly Winter Session : विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतरही विधानसभेत दोन्ही बाजूच्या आमदारांनी गदारोळ केला. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला.

Dec 19, 2022, 05:31 PMIST

फिनोलेक्स पाइप्सतर्फे किसान अग्री शोचे पुण्यात आयोजन

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. तर्फे किसान अ‍ॅग्री शो मध्ये प्लम्बिंग आणि सॅनिटेशन व शेती क्षेत्रासाठी पीव्हीसी- यू पाइप्सची अद्ययावत श्रेणी सादर केली जाणार आहे. किसान अ‍ॅग्री शो हे शेतकऱ्यांसाठी भारतातील सर्वात मोठे शेतीविषयक व्यासपीठ देणारे प्रदर्शन पुण्यात १४ ते १८ डिसेंबरदरम्यान भरवण्यात आले होते. फिनोलेक्स पाइप्सद्वारे शेतीसाठी लागणाऱ्या पीव्हीसी- यू प्रेशर पाइप्स आणि फिटिंग्जची मोठी श्रेणी सादर केली जाणार असून ही उत्पादने शेती व जलसिंचनाशी संबंधित विविध प्रकारचा दाब आणि गुरुत्वाकर्षणाचा प्रवाह लक्षात घेऊन खास तयार करण्यात आली आहे. पुणे किसान अ‍ॅग्री शो भारतीय शेती उद्योगासाठी एकच व्यासपीठ पुरवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शेती व्यावसायिक, निर्णयकर्ते, समविचारी व्यक्ती, सरकारी अधिकारी आणि भारताच्या सर्व भागांतील मीडिया एकत्र येऊन भारतीय शेती क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधण्यात आला.

Dec 19, 2022, 05:27 PMIST

एअर इंडियाची मुंबई ते सॅनफ्रॅन्सिस्को थेट विमानसेवा सुरु

भारतातील आघाडीची एअरलाईन एअर इंडियाने १५ डिसेंबर २०२२ पासून मुंबई आणि सॅन फ्रांसिस्कोदरम्यान पहिली नॉन-स्टॉप सेवा सुरु केली आहे. २ डिसेंबर २०२२ रोजी एअर इंडियाने बंगलोर आणि सॅन फ्रांसिस्कोदरम्यान आठवड्यातून तीनदा विमानसेवा सुरु केली होती, त्यानंतर लगेचच ही मुंबईहून सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. नव्याने भरती करून घेण्यात आलेल्या बोईंग ७७७-२००एलआर एअरक्राफ्टचा यामध्ये वापर केला जाईल आणि दर आठवड्याला मंगळवार, गुरुवार व शनिवार अशा तीन दिवशी मुंबई-सॅन फ्रांसिस्को विमानसेवा उपलब्ध असेल. सध्या एअर इंडियाच्या नॉन-स्टॉप विमानसेवा मुंबई ते न्यूयाॅर्क, दिल्ली ते न्यूयॉर्क, नेवार्क, वॉशिंग्टन डीसी, सॅन फ्रांसिस्को आणि शिकागो, बंगलोर ते सॅन फ्रांसिस्को या मार्गांवर उपलब्ध आहेत. दिल्ली आणि बंगलोरनंतर मुंबई हे भारतातील तिसरे शहर आहे जिथून सॅन फ्रांसिस्कोसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे.

Dec 19, 2022, 05:27 PMIST

टाटा मोटर्स बीएमटीसी यांच्यात करार

टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने बेंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्‍सपोर्ट कॉर्पोरेशनची (बीएमटीसी) उपकंपनी असलेल्या टीएमएल स्‍मार्ट सिटी मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स लि. सोबत करारावर स्‍वाक्षरी केली आहे. या कराराचा भाग म्‍हणून टीएमएल स्‍मार्ट सिटी मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स लि. १२ वर्षांसाठी १२-मीटर लो-फ्लोअर इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्‍यासोबत कार्यसंचालन व देखरेख पाहणार आहे. टाटा स्‍टारबस इलेक्ट्रिक स्‍वदेशी विकसित करण्‍यात आलेली वेईकल असून या वेईकलमध्‍ये स्थिर व आरामदायी प्रवासासाठी डिझाइन केलेली उच्‍च दर्जाची डिझाइन व दर्जात्‍मक वैशिष्‍ट्ये आहेत.

Dec 19, 2022, 05:26 PMIST

व्हर्च्युअल डिजीटल असेस्टच्या उलाढालीत वाढ

२०२२ मध्ये व्हर्च्युअल डिजीटल असेस्टच्या उलाढालीत वाढ झाल्याचा निष्कर्ष वझीरएक्स या कंपनीच्या अभ्यास अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे ४१ ते ६० या वयोगटातील महिलांनी त्याच वयोगटातील पुरुषांपेक्षा जास्त व्हर्च्युअल डिजिटल अॅसेट्सची उलाढाल केली आहे. क्रीप्टो खरेदी करणाऱ्यांपैकी २७% ग्राहकांनी वझीरएक्सवर शिब टोकन्स विकत घेतले असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. एलाॅन मस्कच्या ट्वीटर हस्तांतरणामुळे प्लॅटफॉर्मवरच्या डॉज कॉईनच्या एकूण उलाढालीवर परिणाम झाला असून हस्तांतरण पूर्ण झाल्यावर प्लॅटफॉर्मवरील डॉज कॉईनच्या उलाढालींची पातळी ३०००% नी वाढली आहे.

Dec 19, 2022, 01:41 PMIST

Winter Session : सत्ताधारी आणि विरोधकांच्या गदारोळात विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित

Maharashtra Assembly Winter Session : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद, महापुरुषांचा अपमान आणि राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात जात असल्याच्या मुद्द्यावरून विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधारी भाजप-शिंदे गटाला धारेवर धरलं आहे. विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतरही विधानसभेत दोन्ही बाजूच्या आमदारांनी गदारोळ केला. त्यानंतर आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Dec 19, 2022, 07:33 AMIST

स्वाधार योजनेच्या लाभर्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप

पुणे: समाजकल्याण विभागाच्या स्वाधार योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या अर्जदारांना समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवन येथे योजनेच्या मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.  कार्यक्रमास समाजकल्याण सहआयुक्त भारत केंद्रे, उपायुक्त विजयकुमार गायकवाड, , बाळासाहेब सोळंकी, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहायक आयुक्त संगिता डावखर, विशेष अधिकारी एम. आर. हरसुरे आदी उपस्थित होते. 

Dec 19, 2022, 07:31 AMIST

Winter Assembly Session : आजपासून हिवाळी अधिवेशन; विरोधक सरकारवर करणार हल्ला

Winter Assembly Session : नागपूर येथे आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरवात होत आहे. यासाठी शहरात चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. विरोधक विविध मुद्यांवरून सरकारला घेरणार आहे.

    शेअर करा