मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Political crisis Live: देवेंद्र फडणवीस दिल्लीत; अमित शहांना भेटणार
Devendra Fadnavis

Maharashtra Political crisis Live: देवेंद्र फडणवीस दिल्लीत; अमित शहांना भेटणार

Jun 28, 2022, 03:09 PMIST

Maharashtra political crisis after Revolt in Shiv Sena Live: सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांना ११ जुलैपर्यंत दिलासा दिला आहे. त्यातच दुसरीकडे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली आहे. त्यामुळे आता राज्यात पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Jun 28, 2022, 02:05 PMIST

माझ्याबरोबरचे ५० लोक स्वत:च्या इच्छेनं आले आहेत - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी प्रथमच साधला मीडियाशी संवाद. गुवाहाटीतील सर्व आमदार स्वच्छेनं इथं आले आहेत. एक भूमिका घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत. कुणावरही जबरदस्ती करण्यात आलेली नाही. गुवाहाटीतील आमदार कोणाच्याही संपर्कात नाहीत. ते तसं म्हणत असतील तर त्यांनी नावं सांगावीत - एकनाथ शिंदे

Jun 28, 2022, 01:23 PMIST

Uday Samant: शिवसेनेचा राज्यसभेचा उमेदवार घटक पक्षांनीच पाडला - उदय सामंत

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वाईट नजरेपासून शिवसेनेला वाचवण्याची गरज आहे. शिवसेनेचा राज्यसभेचा उमेदवार महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीच पाडला, असा आरोप बंडखोर आमदार उदय सामंत यांनी केला आहे.

Jun 28, 2022, 01:20 PMIST

Deepak Kesarkar: आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे नेतृत्व करावं - दीपक केसरकर

आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे विनम्रपणे नेतृत्व करावं. संजय राऊत यांच्यासारखं करू नये. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आमचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत - दीपक केसरकर

Jun 28, 2022, 01:20 PMIST

Deepak Kesarkar: प्रेतांच्या जीवावर तुम्ही निवडून आलात. तुम्हाला काही तरी वाटलं पाहिजे - दीपक केसरकर

संजय राऊत हे आम्हाला प्रेतं म्हणतात. याच प्रेतांच्या जीवावर तुम्ही खासदार झाला आहात. मी माझ्या हातानं तुम्हाला मत दिलं आहे. अजूनही तुम्ही शपथ घेतली नाही. आमची मतं नको असतील तर राजीनामा द्या. - दीपक केसरकर

Jun 28, 2022, 01:11 PMIST

Deepak Kesarkar: आम्ही उद्धव ठाकरे यांचे सैनिक आहोत. आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही - दीपक केसरकर

आम्ही उद्धव ठाकरे यांचे सैनिक आहोत. आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही. मुंबईत बाळासाहेबांची शिवसेनाच राहावी असं आमचं मत आहे. आमचा पक्ष संपवण्याचा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्याविरोधात आमचा लढा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबची आघाडी तोडा, आम्ही परत येऊ. आम्हाला बदनाम करू नका. शेवट गोड करा - दीपक केसरकर

Jun 28, 2022, 11:39 AMIST

Shiv Sena Revolt News: सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फोन केल्याच्या बातम्या चुकीच्या. विश्वास ठेवू नका - शिवसेना

सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता, अशा स्वरूपाच्या बातम्या प्रकाशित होत आहेत. यात काहीही तथ्य नसून ह्या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव ठाकरे जे बोलायचं, ते खुलेआम बोलतात. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये, असं शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Jun 28, 2022, 11:39 AMIST

Eknath Shinde Group: ११ जुलैपर्यंत इथंच राहू, पण ऑपरेशन पूर्ण केल्याशिवाय परतणार नाही - भरत गोगावले

एकनाथ शिंदे गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. यानंतर बंडखोर आमदारांचा गुवाहाटीतील मुक्काम वाढला आहे. शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं की, ‘११ जुलैपर्यंत इथं रहावं लागतं तरी चालेल, पण आम्ही ऑपरेशन पूर्ण केल्याशिवाय परत येणार नाही. आमच्या गटात कोणीही बंडखोरी करणार नाही.’

Jun 28, 2022, 11:26 AMIST

Sanjay Raut: राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची फाइल कुठल्या झाडाझुडपात पडलीय? - संजय राऊत

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची फाइल राजभवनातील कुठल्या झाडाझुडपात पडली आहे? करोनातून बरे होऊन ते कामाला लागले असतील तर चांगलं आहे. त्यांनी ती १२ आमदारांची फाइल ताबडतोब क्लिअर करावी - संजय राऊत 

Jun 28, 2022, 09:58 AMIST

Sanjay Raut: अलिबागमध्ये आज शिवसेनेचा मेळावा; संजय राऊत मार्गदर्शन करणार

सक्तवसुली संचालनालयाची (ED) नोटीस आल्यानंतरही संजय राऊत सक्रिय असून आज ते अलिबागमध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. ईडीसमोर हजर राहण्यासाठी त्यांनी वेळ वाढवून मागितली आहे.

Jun 28, 2022, 09:58 AMIST

Maharashtra political crisis: शिवसेना खासदार संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा प्रेतांच्या मुद्द्यावर ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटलं की,"जहालत एक किस्म की मौत है और जाहिल लोग चलती फिरती लाशें है." आगतिकता हा एक प्रकारे मृत्यू असून आगतिक लोक हे चालते फिरते मृत्यू असल्याचं म्हणत यातून त्यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. याआधी त्यांनी वक्तव्य केलं होतं की, आसाममधून परत येतील ते जिवंत मृतदेह असतील. 

Jun 28, 2022, 09:58 AMIST

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ गुवाहाटीत पोस्टरबाजी

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ गुवाहाटीत पोस्टर्स लावण्यात आली आहेत. गर्व से कहो हम हिंदू है, शिंदे साहब हम तुम्हारे साथ है अशी पोस्टर्स गुवाहाटीतील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये लावली आहेत.

    शेअर करा