मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Police: राज्यात मोठी पोलीस भरती, १७ हजार जणांना रोजगार मिळणार!

Maharashtra Police: राज्यात मोठी पोलीस भरती, १७ हजार जणांना रोजगार मिळणार!

Mar 05, 2024, 09:28 AM IST

    • Maharashtra Police Recruitment 2024: पोलीस शिपाई , पोलीस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल या पदांसाठी आजपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
Mumbai Police (PTI)

Maharashtra Police Recruitment 2024: पोलीस शिपाई , पोलीस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल या पदांसाठी आजपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

    • Maharashtra Police Recruitment 2024: पोलीस शिपाई , पोलीस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल या पदांसाठी आजपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

Maharashtra Police: राज्यात १७ हजार पोलिस शिपायांची भरती करण्याची घोषणा करण्यात आली. या भरतीसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी policerecruitment2024.mahait.org आणि http://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

ट्रेंडिंग न्यूज

Mahanand Dairy : महाराष्ट्राच्या ‘महानंद’वर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा! NDDB कडे हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण

SSC HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परिक्षेचा उद्या निकाल?

Lok Sabha Election 2024 : महायुतीतील मतभेद मिटवण्यासाठी एकनाथ शिंदे नाशिकला रवाना!

Mumbai Womens Abuses Police : मुंबईत तीन मद्यधुंद तरुणींची पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण, नेमकं प्रकरण काय?

या भरतीअंतर्गत पोलीस शिपाई , पोलीस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल यांची पदे भरली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये प्रथम उमेदवाराची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून प्रवर्गामधील रिक्त पदाच्या १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे.

पात्रता आणि अर्ज शुल्क

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे आहे. खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये शुल्क भरावे लागेल. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ३५० रुपये शुल्क भरावे लागेल.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा