मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 31 July 2022 Live: संजय राऊतांच्या घरातून ईडीने जप्त केले साडे अकरा लाख रुपये
Shiv Sena MP Sanjay Raut (PTI)

Marathi News 31 July 2022 Live: संजय राऊतांच्या घरातून ईडीने जप्त केले साडे अकरा लाख रुपये

Aug 01, 2022, 01:39 AMIST

Marathi News Live Updates: राज्यासह देश विदेशातील ताज्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे लेटेस्ट अपडेट.

Aug 01, 2022, 01:39 AMIST

पुण्यात दहशत माजविणाऱ्या गुंडावर कारवाई

येरवडा भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. गुंडाला वर्षभरासाठी ओैरंगाबादमधील कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. निहाल विशाल भाट (वय २३, रा. भाटनगर, येरवडा) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. भाट सराइत असून त्याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, अपहरण, विनयभंग, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत

Jul 31, 2022, 09:25 PMIST

Aditya Thackeray : सिंधुदुर्ग येथील सावंतवाडी येथील आदित्य ठाकरे यांच्या रॅलीला परवानगी नाकारली

आदित्य ठाकरे हे शिव संवाद यात्रेसाठी उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार आहे. मंत्री सावंतवाडी येथील त्यांच्या यात्रेला परवानगी नाकारण्यात आली आहे. या मार्गावर दीपक केसरकर याचे घर असल्यामुळे रॅलीला परवानगी नाकारली अशी माहिती मिळत आहे.

<p>&nbsp;Yuva Sena chief Aditya Thackeray&nbsp;</p>
&nbsp;Yuva Sena chief Aditya Thackeray&nbsp; (PTI)

Jul 31, 2022, 07:52 PMIST

Sanjay Raut : संजय राऊतांच्या घरातून ईडीने जप्त केले साडे अकरा लाख रुपये; तपास सुरूच

Sanjay Raut Detained After ED Raids संजय राऊत यांच्या घरावर ईडीने कारवाई करत चौकशी नंतर संजय राऊत यांना अटक केली आहे. त्यांच्या घरातून ११ लाख ५० हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई अजून सुरूच असल्याची माहिती मिळत आहे.

Jul 31, 2022, 07:10 PMIST

Dagdusheth Ganapati 'अतिरुद्र महायागाला' दगडूशेठ गणपती मंदिरात प्रारंभ

पुणे : गणेशपूजन, महासंकल्प, महान्यास, तब्बल ११ प्रकारचे श्री गणेश, श्री महादेव अभिषक, गणेश लक्ष अर्चना यांसह विविध प्रकारच्या धार्मिक विधींनी व अकरा दिवसीय अतिरुद्र महायागाला दगडूशेठ गणपती मंदिरात प्रारंभ झाला. जगाच्या कल्याणाकरीता आणि आरोग्यसंपन्न समाजाकरीता १२५ ब्रह्मवृंद सहभागी होत, हा याग करीत आहेत. मंगळवार, दिनांक ९ आॅगस्टपर्यंत दररोज दुपारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी मंदिरात सुरु आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे अतिरुद्र याग मंदिरात करण्यात येत आहे. वेदमूर्ती नटराजशास्त्री आणि ब्रह्मवृंद होम, विधी करीत आहेत. महान्यास, मंत्रघोष, रुद्र जप, रुद्र होम, गणेश याग, सूर्य याग, विविध अभिषेक असे धार्मिक विधी याअंतर्गत केले जात आहेत. मंदिरात सभामंडपात भव्य होमकुंड साकारुन हे अतिरुद्र होम करण्यात येत आहेत.

<p>'अतिरुद्र महायागाला' दगडूशेठ गणपती मंदिरात प्रारंभ</p>
'अतिरुद्र महायागाला' दगडूशेठ गणपती मंदिरात प्रारंभ

Jul 31, 2022, 05:21 PMIST

Sanjay Raut: माझ्याकडं कुठलीही कागदपत्रे सापडली नाहीत, ही राजकीय सुडाची कारवाई - संजय राऊत

माझ्याकडं कुठलीही कागदपत्रे सापडलेली नाहीत. केवळ राजकीय सूडापोटी ही कारवाई सुरू आहे. पण मी झुकणार नाही. शिवसेना संपवण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. मी घाबरणार नाही. उद्धव ठाकरे माझ्या पाठीशी आहेत. निधड्या छातीनं मी या कारवायांना सामोरा जाईन, यातूनच महाराष्ट्राला बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

Jul 31, 2022, 04:43 PMIST

शिवसेनेच्या ठाणे जिल्हा प्रमुख पदी केदार दिघे यांची नियुक्ती 

शिवसेनेच्या ठाणे जिल्हा प्रमुख पदी दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनिता बिर्जे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे . प्रदीप शिंदे यांच्यावर ठाणे शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून चिंतामणी कारखानीस यांची ठाणे विभागीय प्रवक्ते पदावर नेमणूक करण्यात आली आहे 

<p>केदार दिघे</p>
केदार दिघे

Jul 31, 2022, 04:21 PMIST

ED arrested Sanjay Raut : नऊ तासांच्या चौकशी नंतर संजय राऊत यांना ईदी ने केली अटक 

तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. आज सकाळी राऊतांच्या बंगल्यावर ईडीच्या पथकाने त्यांच्या घरी छापेमारी केली होती. काही महिन्यांपूर्वीच पत्राचाळ प्रकरणात ईडीने राऊत (Sanjay Raut) यांना समन्स बजावले होते. मात्र अधिवेशनाचे कारण सांगून त्यांनी चौकशीला हजर राहण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळेच आज ईडीचे पथक घरी दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Jul 31, 2022, 03:21 PMIST

शिंदेच्या बंडानंतर खासदार राजन विचारेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर आता पहिल्यांदाच ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. 'ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून त्याला आणखी मजबूत ठेऊ, हे सांगण्यासाठी मी मातोश्रीवर आलो आहे, आम्ही बाळासाहेब आणि आनंद दिघेंच्या विचारांचे लोक असून आम्ही शिवसेनेसोबतच राहणार असल्याचं' खासदार विचारे म्हणाले.

Jul 31, 2022, 02:49 PMIST

झारखंडच्या तीन आमदारांवर अटकेची कारवाई

पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रकमेसह सापडलेल्या कांग्रेसच्या तीन आमदारांना अटक करण्यात आली आहे. हावडा इथं त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेसने तिन्ही आमदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

Jul 31, 2022, 01:00 PMIST

शिंदेंना दिलासा; उद्या होणारी सुनावणी कोर्टानं पुढं ढकलली!

उद्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेसह इतर सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात येणार होती. परंतु ती आता कोर्टानं पुढे ढकलली आहे. येत्या तीन ऑगस्टला राज्यातील राजकीय पेचावर सर्वोच्च न्यायलय निकाल देणार असल्याची माहिती मिळत आहे.

Jul 31, 2022, 11:47 AMIST

सीबीआय, ईडी स्वतंत्र; यात राजकारण नाही - रावसाहेब दानवे

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सुरु असलेली ईडीची कारवाई ही सूडबुद्धीने असल्याचा आरोप केला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, "सीबीआय आणि ईडी स्वतंत्रपणे काम करतात. त्यात राजकारण करण्यासारखं काही नाही."

Jul 31, 2022, 10:22 AMIST

 Sanjay Raut ED Enquiry: 'आग लगी है तभी तो धुआँ उठा है', नवनीत राणा

तुम्ही स्वच्छ चारित्र्याचे आहात तर ईडीसमोर जाऊन बाजू का मांडत नाहीत. पुरावा असल्याशिवाय ईडी कोणावर कारवाई करत नाही. आयुष्याची सुरुवात पत्रकार म्हणून केली. मग इतकी मोठी संपत्ती जमा कशी केली. महाराष्ट्राने कष्टाने मिळवलेले पैसे तुम्ही भ्रष्टाचार करून लाटले. अशा व्यक्तीवर कारवाई व्हायला हवी अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली.

<p>नवनीत राणा</p>
नवनीत राणा (फोटो - पीटीआय)

Jul 31, 2022, 10:07 AMIST

Earthquake : नेपाळ भूकंपानं हादरलं, बिहारमध्येही जाणवले धक्के

Earthquake In Nepal : भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये भूकंप झाल्याची माहिती समोर येत आहे. या भूकंपाचे धक्के भारताच्या बिहारमध्येही जाणवल्याची माहिती आहे. यात जिवित व वित्तहानी झाल्याची माहिती अजून समोर आलेली नाही.

Jul 31, 2022, 09:31 AMIST

माझा कोणत्याही घोटाळ्याशी संबंध नाही- संजय राऊत 

बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही, बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय, त्यामुळं शिवसेनेसाठी लढत राहणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

Jul 31, 2022, 09:07 AMIST

'राऊतांना अटक होण्याची शक्यता, शिवसैनिकांना आनंद', आमदार शिरसाट

राऊतांना अटक होण्याची जास्त शक्यता आहे. शिवसैनिकांना आनंद झाला असेल. शिवसैनिकाला वाटत असेल ज्याच्यामुळे शिवसेना फुटली, ज्याच्या भोंग्यामुळे शिवसेनेचे ४० आमदार, १२ खासदार गेले ते सर्व आनंदी आहेत अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार शिरसाट यांनी दिली. तसंच हा काय मास लिडर नाही, प्रवक्ता होता. त्यामुळे उठाव होईल असं नाही. सूडभावना वगैरे नाही, कायद्याचं राज्य आहे, जर त्यात राऊतांची चूक नसेल तर ते सुटतील असं म्हणत कर नाही तर डर कशाला असं आमदार शिरसाट यांनी म्हटलं.

Jul 31, 2022, 08:30 AMIST

राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान आमनेसामने

Commonwealth Games : राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानच्या महिला संघांमध्ये लढत होणार आहे. त्यामुळं या सामन्याकडं क्रीडाप्रेमींचं लक्ष असेल. या स्पर्धेत भारतीय महिला संघाला पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.

Jul 31, 2022, 08:29 AMIST

Farmer Protest : किसान मोर्चाचं आज देशभरात चक्का जाम आंदोलन

केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या एमएसपी कमिटीच्या धोरणांच्या विरोधात आज किसान मोर्चानं चक्का जाम आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय दिल्लीतील आंदोलनात शेतकऱ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हेही मागे घ्यावेत, ही शेतकरी संघटनांची मागणी आहे.

Jul 31, 2022, 08:09 AMIST

पत्राचाळ प्रकरण: संजय राऊत यांच्या घरी पोहोचले ईडीचे पथक

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकऱणी संजय राऊत यांना समन्स पाठवण्यात आले होते. मात्र समन्सला उत्त दिलं न गेल्यानं त्यांच्या चौकशीसाठी ईडीचे पथक घरी पोहोचले असल्याचं सांगण्यात येत आहे.

Jul 31, 2022, 07:41 AMIST

Jammu And Kashmir : बारामुल्लात चकमकीत दहशतवाद्याला कंठस्नान

बारामुल्ला इथं झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. त्याच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. अद्याप परिसरात शोधमोहिम सुरू असल्याचं जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सांगितले.

Jul 31, 2022, 07:32 AMIST

Monkeypox : देशातील मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण झाला बरा, रुग्णालयातून डिस्चार्ज

देशातील पहिल्या मंकीपॉक्सच्या रुग्णाला शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. युएईवरून केरळमध्ये आलेल्या ३५ वर्षीय तरुणावर कोल्लम इथं १७ दिवस उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती केरळच्या आरोग्य मंत्री विना जॉर्ज यांनी दिली.

    शेअर करा