मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 25 October 2022 Live: व्हॉट्सॲप डाउन; मेसेज जात नसल्यामुळं युजर्सची घालमेल, चीडचीड
Whatsapp (REUTERS)

Marathi News 25 October 2022 Live: व्हॉट्सॲप डाउन; मेसेज जात नसल्यामुळं युजर्सची घालमेल, चीडचीड

Oct 25, 2022, 02:41 PMIST

Marathi News Live Updates : व्हॉट्सअॅप अचानक डाउन झालं आहे. व्हॉट्सअॅपवरून पाठवलेले संदेश एकमेकांपर्यंत पोहोचत नसल्यानं युजर्स हैराण झाले आहेत.

Oct 25, 2022, 02:41 PMIST

Congress : विदर्भात विधानसभेच्या ४४ जागा जिंकू, कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंचा दावा

Maharashtra Assembly Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीत विदर्भातून आठ आणि विधानसभेला ४४ जागा जिंकू, असा विश्वास कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा कॉंग्रेसला विदर्भात फायदा होणार असल्याचंही लोंढे म्हणाले.

Oct 25, 2022, 01:02 PMIST

Whatsapp Down: व्हॉट्सअॅप डाउन; संदेश जात नसल्यामुळं युजर बेचैन

व्हॉट्सअॅप अचानक डाउन झालं आहे. व्हॉट्सअॅपवरून पाठवलेले संदेश एकमेकांपर्यंत पोहोचत नसल्यानं युजर्स हैराण झाले आहेत. चीडचीड सुरू आहे. एकमेकांना फोन करून विचारणा होत आहे. व्हॉट्सअॅपकडून अधिकृत कोणतीही माहिती न आल्यामुळं संभ्रम वाढला आहे.

Oct 25, 2022, 12:14 PMIST

Stock Market: शेअर बाजारात विक्रीचा जोर, सेन्सेक्स घसरला

दिवाळीतील मुहुर्ताच्या ट्रेडिंगच्या वेळेत वधारलेला शेअर बाजार आज पुन्हा घसरला आहे. सेन्सेक्समध्ये १५० अंकांची घसरण झाली असून निफ्टी ४० अंकांनी कोसळला आहे.

Oct 25, 2022, 11:54 AMIST

Sharad Pawar: शरद पवार यांनी केलं ऋषी सुनक यांचं अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधआन ऋषी सुनक यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिनंदन केलं आहे. आर्थिक संकटाच्या काळात ऋषी सुनक यांच्यावर देशाच्या सर्वोच्च पदाची जबाबदारी आली आहे. त्यांच्या हातून देशासाठी उत्तम कार्य होईल, अशा शुभेच्छा पवारांनी दिल्या आहेत.

Oct 25, 2022, 08:15 AMIST

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर

Eknath Shinde Gadchiroli Visit Today : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील भामरागड आणि दोडराजमध्ये स्थानिकांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.

Oct 25, 2022, 07:59 AMIST

सितरंगचा तडाखा! बांगलादेशात ७ जणांचा मृत्यू, लाखोंचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

उत्तर बंगालच्या खाडीत सितरंग चक्रीवादळ इशान्येच्या दिशेने सरकल्याने आणि सोमवारी २६० किमी अग्नेयेला धडकल्यानंतर हवामान विभागाने बंगालच्या किनारपट्टी भागात आणि इशान्येकडील राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बांगलादेशमध्ये सितरंगमुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी बांगलादेशमधील २ लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

    शेअर करा