मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 22 July 2022 Live: कोयना परिसर व नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के
Koyna Dam (HT PHOTO) (Hindustan Times)

Marathi News 22 July 2022 Live: कोयना परिसर व नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

Jul 22, 2022, 11:05 PMIST

Daily News Live Updates: राज्यासह देश विदेशातील ताज्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे लेटेस्ट अपडेट.

Jul 22, 2022, 11:05 PMIST

नाशिक जिल्ह्यातील पेठ आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूकंपाचे धक्के

नाशिक जिल्ह्यात भूकंप झाल्याचे वृत्त आहे. पेठ आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही गावांत भूकंपाचे धक्के (Mild Earthquake) जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. खरपडी, नाचलोंडी, धानपाडा, ठाणापाडा परिसरात भूकंपाचे धक्के बसले आहेत.

Jul 22, 2022, 07:25 PMIST

बिबवेवाडी, धनकवडीत भरदिवसा घरफोडी सदनिकेतून दहा लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पुण्यात घरफोडीचे सत्र सातत्याने सुरू आहे. अशीच एक घटना बिबवेवाडी परिसरात उघडकीस आली आहे. एका सदनीकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी सुमारे दहा लाख रुपयांचा एवज लंपास केला आहे. याबाबत नवनाथ कांबळे (वय ४०, रा. गणेश व्हिला सोसायटी, बालाजीनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे कुटुंबीय सदनिका बंद करुन सकाळी बाहेर पडले. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले.  कपाटातून पाच लाख ६० हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले. पोलीस उपनिरीक्षक खंडाळे तपास करत आहेत.

pune crime

pune crime (HT_PRINT)

Jul 22, 2022, 07:24 PMIST

बेकायदा पिस्तुल विक्री प्रकरणात गुंडाला पकडले

पुणे : पुण्यात बेकायदा देशी बनावटीचे पिस्तुल विक्री प्रकरणात गुंडाला दत्तवाडी पोलिसांनी दांडेकर पूल परिसरात पकडले. त्याच्याकडून पिस्तुल घेणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. सूर्यकांत उर्फ पंडित दशरथ कांबळे (वय २६, रा. ताडीवाला रस्ता, खड्डा झोपडपट्टी आणि आंबेडकर झोपडपट्टी, दत्तवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कांबळे याच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याने रफीक उर्फ बबलू नबीलाल शेख (वय ३१, रा. दत्तवाडी), प्रमोद उर्फ कमलेश कैलास घारे (वय ३१, रा. दांडेकर पूल) यांना देशी बनावटीचे पिस्तुल विकले होते.

Jul 22, 2022, 07:23 PMIST

कोथरुडमधील गुंड टोळीवर मोक्का कारवाई

पुणे : कोथरुडमध्ये दहशत माजविणारा गुंड दीनानाथ उर्फ सोन्या पवार आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी दीनानाथ उर्फ सोन्या गोरक्षनाथ पवार (वय २२, एक्स सर्व्हिसमन कॉलनी, चाळ क्रमांक ५, शास्त्रीनगर, कोथरूड), अक्षय उर्फ ज्वाला शांताराम येवले (वय २३, रा. सुतारदरा, कोथरूड), प्रदीप उर्फ पद्या भोला मिर्धा (वय १९, रा. सूस गाव, ता. मुळशी) तसेच त्यांच्या टोळीतील एका अल्पवयीन मुलाविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

Pune crime

Pune crime  (HT_PRINT)

Jul 22, 2022, 07:21 PMIST

ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांचे पुण्यात निधन

पुणे : ज्येष्ठ लेखक, कांदबरीकार अनंत उर्फ नंदा खरे (वय ७६) यांचे आज शुक्रवारी (दि २२) पुण्यात आजारपणामुळे निधन झाले. ७६ वर्षांचे होते. मराठीत त्यांनी विधि विषयात अनेक साहित्यकृती लिहिल्या आहेत. नंदा खरे हे विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टीचा पुरस्कार करणारे लेखक म्हणून ओळखले जायचे. अंताजीची बऱखर, उद्या, बखर अंतकाळाची, या त्यांच्या कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या. त्यांना कहाणी मानवप्राण्याची हा ग्रंथ त्यांच्या वैचारिक लेखनाची ओळख घडवणारा ठरला.

Nanda Khare

Nanda Khare

Jul 22, 2022, 06:26 PMIST

स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समित्यांचे रँकिंग होणार जाहीर

पुणे : मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत राज्यभरातील बाजार समित्यांची त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी (रँकिंग) पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात येणार आहे. राज्यामध्ये प्रथमच अशा प्रकारे बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्याचे पणन संचालक सुनील पवार यांनी दिली.

जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यामध्ये स्मार्ट प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पाअंतर्गत पणन संचालनालय स्तरावर प्रकल्प अंमलबजावणी कक्ष कार्यरत आहे. स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमापैकी राज्यातील बाजार समित्यांची त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी प्रसिद्ध करणे' हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. राज्याच्या कृषी बाजार व्यवस्थेतील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे. बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर झाल्यांनतर राज्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत आपण शेतमाल नेत असलेल्या बाजार समितीचे स्थान शेतकऱ्यांना समजण्यास मदत होणार आहे. तसेच बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधा देण्याची निकोप स्पर्धा निर्माण होण्यास मदत होणार आहे. बाजार समित्यांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेसाठी बाजार समितीत असलेल्या पायाभूत व इतर सुविधेनुसार निकष तयार करण्यात आलेले आहेत. २०२१-२२ या वर्षाच्या कामगिरीनुसार क्रमवारी ठरविण्यासाठी ३५ निकष व २०० गुण ठरवण्यात आले आहेत. त्यामध्ये पायाभूत सुविधा व इतर सेवा-सुविधा अंतर्गत १४ निकष असून त्यासाठी एकूण ८० गुण, आर्थिक कामकाजाबाबत ७ निकष- ३५ गुण, वैधानिक कामकाजाबाबत ११ निकष- ५५ गुण तर योजना उपक्रमातील सहभाग व इतर विषयी ३ निकष असून त्यासाठी ३० गूण असे एकूण २०० गुणांवर आधारीत ही क्रमवारी असेल.

Jul 22, 2022, 05:37 PMIST

पोलीस कुटूंबातील महिलांना पाककलेचे धडे; महिला कर्मचारी आणि कुटूंबियांचा सहभाग

पुणे: पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांसाठी पाककला प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात २० ते २१ जुलैलदरम्यान प्रशिक्षण पार पडले. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या पत्नी जुगनू गुप्ता यांनी आणि अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या पत्नी पुनम सुपेकर यांनी उपस्थित महिला कर्मचाऱ्यांसह पोलिस कुटूंबिंयाना पाककलेचे प्रशिक्षण दिले.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्यावतीने महिला पोलीस अंमलदारांसह पोलीस कुंटुबातील महिलांसाठी पाककलेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस वसाहतीतील महिला वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होता. दररोजच्या आहारासह वेगवेगळे चविष्ठ पदार्थ कसे बनवावेत याचे प्रात्यिक्षिक दाखविण्यात आले. पोलीस कुटूंबातील महिलांना अत्यंत सोप्या पध्दतीने कमी वेळात रुचकर पदार्थ कसे बनवावेत याविषयीचे मार्गदर्शन जुगनू गुप्ता यांनी केले. यावेळी उपस्थित महिला अमलदारांसह पोलिस कुटूंबियांनी त्यांचे आभार मानले. प्रशिक्षणामधुन नाविण्यपुर्ण पदार्थ शिकायला मिळाल्याने महिलांनी आनंद व्यक्त केला.

पोलीस कुटूंबातील महिलांना पाककलेचे धडे; महिला कर्मचारी आणि कुटूंबियांचा सहभाग

पोलीस कुटूंबातील महिलांना पाककलेचे धडे; महिला कर्मचारी आणि कुटूंबियांचा सहभाग

Jul 22, 2022, 04:33 PMIST

घरोघरी तिरंगा उपक्रम समन्वयाने यशस्वी करा; मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या सूचना

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा ( हर घर तिरंगा) उपक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करा, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याअंतर्गत घरोघरी तिरंगा उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक झाली. मुख्य सचिव यांच्या दालनात झालेल्या बैठकीस अपर मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, प्रधान सचिव नंदकुमार, प्रधान सचिव मनीषा वर्मा, प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, प्रधान सचिव सोनिया सेठी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डी, सचिव सुमंत भांगे, सचिव रणजित सिंह देओल, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आदी उपस्थित होते. सर्व विभागांनी आपल्या अधिनस्त कार्यालयात, आस्थापनामध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व इमारती, अधिकारी, कर्मचारी वसाहतीत तिरंगा फडकवला जाईल याबाबतची तयारी केली जावी, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या. घरोघरी तिरंगा उपक्रमाबाबत जाणीव जागृती करावी. लोकांना उपक्रमाबाबत माहिती व्हावी यासाठी विविध माध्यमांतून माहिती शिक्षण संवाद उपक्रम राबविण्यात यावेत, अशा सूचनाही मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.

Jul 22, 2022, 03:53 PMIST

कोयना परिसराला ३ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा सौम्य धक्का

कोयना परिसराला दुपारी १ च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले. भूकंपमापकावर याची नोंद ३ रिश्टर स्केल एवढी नोंदणी करण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू हा कोयनेपासून १२ किमी अंतराव आहे. कोयना खो-यातील हेळवाक गावाच्या जवळ हे केंद्र होते. दरम्यान, नागरिकांनी घाबरण्याचे काही कारण नाही असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकारचे असे सौम्य भूकंपाचे धक्के हे सातत्याने बसत असतात.

Jul 22, 2022, 03:34 PMIST

कोयना परिसराला ३ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा सौम्य धक्का

कोयना परिसराला दुपारी १ च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले. भूकंपमापकावर याची नोंद ३ रिश्टर स्केल एवढी नोंदणी करण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू हा कोयनेपासून १२ किमी अंतराव आहे. कोयना खो-यातील हेळवाक गावाच्या जवळ हे केंद्र होते. दरम्यान, नागरिकांनी घाबरण्याचे काही कारण नाही असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकारचे असे सौम्य भूकंपाचे धक्के हे सातत्याने बसत असतात.

Koyna Dam (HT PHOTO)

Koyna Dam (HT PHOTO) (Hindustan Times)

Jul 22, 2022, 03:14 PMIST

आजी माजी उपमुख्यमंत्र्यांच्या एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्चा ट्विटरवरून दिल्या होत्या. याबद्दल फडणवीस यांनी आभार मानले. तसेच अजित पवार यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार

Jul 22, 2022, 03:08 PMIST

Nagpur Shiv Sena: शिवसेनेचे नागपूर ग्रामीण जिल्हाप्रमुख संदीप इटकीलवार शिंदे गटात

एकनाथ शिंदे गटाकून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना गळा लावण्याचे प्रयत्न सुरूच असून त्याला अनेक ठिकाणी यश येत आहे. शिवसेनेचे नागपूर ग्रामीण जिल्हाप्रमुख संदीप इटकीलवार हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

Jul 22, 2022, 02:21 PMIST

CBSE Result: CBSE ने बारावीनंतर दहावीचे निकालही केले जाहीर

CBSE ने आज सकाळी बारावीचा निकाल जाहीर केला. त्यानंतर लगेच दहावीचा निकालही जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसईच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

Jul 22, 2022, 01:34 PMIST

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिला वाढदिवसाच्या शुभेच्छा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननिय देवेंद्र फडणवीसजी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! अशा शब्दात अजित पवार यांनी ट्विट केलं आहे.

Jul 22, 2022, 03:05 PMIST

Eknath Shinde in Delhi: मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आज अमित शहा यांची भेट घेणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. राज्यातील संभाव्य मंत्र्यांच्या यादीवर या भेटीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Jul 22, 2022, 12:50 PMIST

Share Market: शेअर बाजारात तेजी कायम; सेन्सेक्स २५० अंकांनी वाढला

गेल्या दोन दिवसांत शेअर बाजारात दिसलेलं सकारात्मक वातावरण आजही कायम आहे. सेन्सेक्स आज २५० पेक्षा जास्त अंकांनी वधारला असून निफ्टीही ८० अंकांनी वाढून १६,६९० वर ट्रेड करत आहे.

Jul 22, 2022, 12:35 PMIST

Monsoon Session: 'मोदी CM असताना काँग्रेसने त्यांना छळलं', केंद्रीय मंत्र्यांचा आरोप

राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सुप्रीम कोर्टातही गेले, मात्र सुप्रीम कोर्टानेही खटला रद्द केला नाही. सध्या दोघेही जामिनावर आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदी हे मुख्यमंत्री असताना छळलं. काल ते संसदेच्या कामकाजावेळी उपस्थित नव्हते. आम्ही वाढत्या किंमतींबाबत चर्चा करण्यास तयार झालो होतो अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.

Jul 22, 2022, 12:19 PMIST

Sanjay Raut: भविष्यात महाराष्ट्र शिवसेनामय झालेला दिसेल - संजय राऊत

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. ते जातील तिथं, शिवसेना झिंदाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत. भविष्यात महाराष्ट्राचं वातावरण शिवसेनामय झालेलं दिसेल. त्याची ही सुरुवात आहे. लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत. त्याची तयारी सुरू आहे. - संजय राऊत

Jul 22, 2022, 10:34 AMIST

Sri Lanka : लंकेच्या पंतप्रधानपदी दिनेश गुनवर्धने यांची नियुक्ती

लंकेचे पंतप्रधान म्हणून दिनेश गुनवर्धने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोलंबोत पंतप्रदान कार्यालयात त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

लंकेचे नवे पंतप्रधान दिनेश गुनवर्धने

लंकेचे नवे पंतप्रधान दिनेश गुनवर्धने (फोटो - रॉयटर्स)

Jul 22, 2022, 09:53 AMIST

CBSE 12th Result: सीबीएसईने १२ वीचा निकाल केला जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) १२ वीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्तळावर निकाल चेक करता येईल, तसंच गुणपत्रक डाऊनलोड करण्याची सुविधासुद्धा असेल.

Jul 22, 2022, 09:40 AMIST

Devendra Fadnavis Birthday: एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Jul 22, 2022, 07:57 AMIST

Sri Lanka: लंकेत आंदोलकांविरोधात थेट लष्कराकडून कारवाई

श्रीलंकेत नव्या राष्ट्रपतींची निवड झाल्यानंतर आता लष्कराने आंदोलकांविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. राष्ट्रपती सचिवालयाबाहेर असणाऱ्या आंदोलकांना तिथून हटवण्यात आलं आहे.

Jul 22, 2022, 07:49 AMIST

'माझ्याकडे बॉम्ब आहे', विमानात प्रवाशाच्या दाव्याने खळबळ

दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात प्रवाशाने बॉम्ब असल्याचा दावा केल्यानं खळबळ उडाली होती. त्यानंतर विमान पटना विमानतळावर उतरवून सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. विमानाची संपूर्ण तपासणी करण्यात आली. त्यात कोणताही बॉम्ब आढळून आला नाही. प्रवाशाने खोटा दावा केल्यानं त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शेअर करा