मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 21 October 2022 Live: पंतप्रधान मोदी आज केदारनाथमध्ये, विविध प्रकल्पांचे उद्घाटन करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी

Marathi News 21 October 2022 Live: पंतप्रधान मोदी आज केदारनाथमध्ये, विविध प्रकल्पांचे उद्घाटन करणार

Oct 21, 2022, 11:37 AMIST

Marathi News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंड दौऱ्यावर असून त्यांनी केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. ते बद्रीनाथलासुद्धा जाणार आहेत.

Oct 21, 2022, 11:37 AMIST

Sachin Sawant: समाजातील सर्व वर्गांमध्ये पसरलेले नैराश्य चिंताजनक - सचिन सावंत

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांची आत्महत्या, नोकरी गेल्याने व्हिडिओ पत्रकार संदिप मोरे यांनी केलेली आत्महत्या तसेच महाराष्ट्रात वाढत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सर्वांमागे आर्थिक कारणे आहेत. समाजातील सर्व वर्गांमध्ये पसरलेले नैराश्य चिंताजनक आहे, असं सांगत, महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.

Oct 21, 2022, 09:35 AMIST

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनावर  आज निर्णय

खंडणी वसुलीच्या आरोपाखाली कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्ट हा निर्णय देणार आहे.  आज दुपारपर्यंत निकाल येईल. देशमुख यांच्या जामीनावरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद काल पूर्ण झाला आहे. मागील ११ महिन्यांपासून अनिल देशमुख तुरुंगात आहेत.

Oct 21, 2022, 08:49 AMIST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथमध्ये, विविध प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथमध्ये असून विविध प्रकल्पांचे उद्घाटन त्यांच्याहस्ते होणार आहे. त्याआधी पंतप्रधान मोदींनी केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. ते बद्रीनाथलासुद्धा जाणार आहेत.

Oct 21, 2022, 07:41 AMIST

औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, खासदार जलील यांची मागणी

औरंगाबाद जिल्ह्यात अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

    शेअर करा