मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 18 September Live : Gramanchayat Election : राज्यातील ५४७ ग्रामपंचायतींसाठी ७६ टक्के मतदान;उद्या निकाल
Gramanchayat Election

Marathi News 18 September Live : Gramanchayat Election : राज्यातील ५४७ ग्रामपंचायतींसाठी ७६ टक्के मतदान;उद्या निकाल

Sep 18, 2022, 08:06 PMIST

Marathi News Live Updates: राज्यासह देश विदेशातील ताज्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे लेटेस्ट अपडेट.

Sep 18, 2022, 08:06 PMIST

Aurangabad Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे संपूर्ण २७ दरवाजे उघडले. पर्यटकांची धरण परिसरात गर्दी

नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे यंदा जायकवाडी धरण तुडुंब भरुन भरले असून  आतापर्यंत इतिहासात पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.  धरणातून तब्बल १ लाख १३ हजार क्यूसेकनं विसर्ग सुरु आहे. पैठण शहरात नदीकाठी राहणाऱ्या साडेसहाशे कुटुंबांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

Sep 18, 2022, 07:41 PMIST

Gramanchayat Election : राज्यातील ५४७ ग्रामपंचायतींसाठी ७६ टक्के मतदान, उद्या लागणार निकाल

राज्यातील विविध १६ जिल्ह्यांमधील ५४७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आज पार पडल्या. या निवडणुकीत ७६ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे. ग्रामपंचायत सदस्य पदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. या ग्रामपंचायतींचा निकाल उद्या सोमवारी जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची गेल्या महिन्यात घोषणा केली होती. त्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आज ५४७ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. तब्बल ७६ टक्के मतदान झाले.

Sep 18, 2022, 06:22 PMIST

PFI Case : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात एनआयएची ४० ठिकाणी छापेमारी, चौघांना अटक

NIA Raid : राष्ट्रीय तपास यंत्रणेने रविवारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात आंध्रप्रदेश तेलंगणात ४० ठिकाणी छापे मारले. यावेळी चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कडून काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Sep 18, 2022, 04:18 PMIST

ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

पुणे : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे व हेल्पेज इंडिया, येरवडा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कालावधीत विशेष मोहिमेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.  शिबिरात ज्येष्ठ नागरिकांना असणारे विकार अथवा इतर शारिरीक व्याधी यांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार असून मोफत डोळे तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित या आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.

Sep 18, 2022, 02:27 PMIST

Raj Thackeray : राज ठाकरेंनी दुसऱ्यांसाठी काम न करता स्वत:चा पक्ष वाढवावा, जयंत पाटलांचा टोला

Raj Thackeray Nagpur Visit : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नागपूरात मनसेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावरूनच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी दुसऱ्या पक्षांचं काम न करता स्वत:चा पक्ष वाढवायला हवा, असा टोला जयंत पाटलांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

Sep 18, 2022, 01:31 PMIST

Bus Accident : धक्कादायक, चीनमध्ये बस उलटल्यानं २७ ठार २० जखमी

Bus Accident In China : चीनमधील एका एक्प्रेसवेवर झालेल्या बस अपघातात २७ जण ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याशिवाय या अपघातात २० जण गंभीर जखमी झाल्यानं मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

Sep 18, 2022, 01:26 PMIST

Raj Thackeray : निवडणुकांना वेळ आहे, कामाला लागा; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

Raj Thackeray Nagpur Visit : विदर्भातील महानगरपालिकांच्या निवडणुकांना अजून बराच वेळ आहे. कुठेही कमी न पडता पूर्ण ताकदीनिशी जनतेत जाऊन काम करा, असा कानमंत्र राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला आहे.

Sep 18, 2022, 01:23 PMIST

Ajit Pawar : क्रीडा विकासाला गती देणं ही आमची जबाबदारी-अजित पवार

LOP Ajit Pawar In Pune : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आल्यानंतर राज्यात राजकीय वादंग पेटलेलं आहे. त्यातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राज्याच्या औद्योगिक आणि क्रीडा विकासाला गती देणं सर्वांची जबाबदारी असल्याचं सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

Sep 18, 2022, 09:04 AMIST

BS Koshyari : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज पुणे दौऱ्यावर

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. खाजगी कामानिमित्त ते पुण्यात येणार असल्याची माहिती आहे. ते आज संध्याकाळी सहा वाजता पुण्यात दाखल होणार असून शहरातील राजभवनात मुक्काम करणार आहेत.

Sep 18, 2022, 09:02 AMIST

Shinde-Fadnavis Govt : सचिवांचे अधिकार पुन्हा मंत्र्यांकडे; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Shinde-Fadnavis Govt : चार ऑगस्टला सचिवांना दिलेले विशेषाधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काढून घेतले आहेत. हे अधिकार आता पुन्हा मंत्र्यांना बहाल करण्यात आल्यानं मंत्रालयातील कामांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. मंत्रालयातील सचिवांना विशेषाधिकार दिल्याच्या निर्णयावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आता सरकारनं निर्णय बदलला आहे.

Sep 18, 2022, 07:58 AMIST

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर

Raj Thackeray Vidarbha Visit : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार असून नागपूरात कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. याशिवाय विदर्भातील पूरस्थितीचीही ते पाहणी करण्याची शक्यता आहे.

Sep 18, 2022, 07:58 AMIST

Elizabeth II Funeral : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लंडनमध्ये दाखल; राणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला राहणार उपस्थित

Queen elizabeth II funeral : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या लंडनमध्ये दाखल झाल्या आहेत. इंग्लंडच्या राणी इलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांपूर्वीच राणी इलिझाबेथ द्वितीय यांचं निधन झालं होतं. त्यानंतर आता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यावेळी जगभरातील प्रसिद्ध मान्यवर उपस्थित असतील.

Sep 18, 2022, 07:20 AMIST

Grampanchayat Electon 2022 : राज्यात आज ६०८ ग्रामपंचायतीसाठी मतदान, पोलिसांचा कडक बंदोबस्त

Grampanchayat Electons In Maharashtra : महाराष्ट्रातील ५१ तालुक्यांतील ६०८ गावांचे कारभारी नेमण्यासाठी आज मतदान होत आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींचा समावेश असून नंदूरबार जिल्ह्यातील १३९ ग्रामपंचायतींमध्ये मतदान पार पडत आहे.

Sep 18, 2022, 07:20 AMIST

Mega Block In Mumbai : मुंबईतील या मार्गावर आज रेल्वेचा मेगाब्लॉक

Mega Block 18 September 2022 : रेल्वे प्रशासनानं मध्य आणि ट्रान्स हार्बरवर रेल्वे रुळांची देखभाल, सिग्नल यंत्रणा दुरुस्ती आणि ओव्हरहेड वायर इत्यादी कामांसाठी आज मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळं वीकेंडला फिरायला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे.

    शेअर करा