मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 13 October 2022 Live: छगन भुजबळ शिवसेनेत असते तर कधीच मुख्यमंत्री झाले असते - उद्धव
Live Blog

Marathi News 13 October 2022 Live: छगन भुजबळ शिवसेनेत असते तर कधीच मुख्यमंत्री झाले असते - उद्धव

Oct 13, 2022, 04:13 PMIST

Marathi News Live Updates : छगन भुजबळ हे विचारानं तरुण नेते आहेत. अनेक वादळे व पावसाळे पचवून उभे आहेत. बाळासाहेब आणि शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांचं मार्गदर्शन लाभलेले भाग्यवंत आहेत. ते आजही शिवसेनेत असते तर कदाचित कधीच मुख्यमंत्री झाले असते, असं प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी आज केलं.

Oct 13, 2022, 04:13 PMIST

Uddhav Thackeray: छगन भुजबळ शिवसेनेत असते तर कधीच मुख्यमंत्री झाले असते - उद्धव ठाकरे

छगन भुजबळ हे विचारानं तरुण नेते आहेत. अनेक वादळे व पावसाळे पचवून उभे आहेत. बाळासाहेब आणि शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांचं मार्गदर्शन लाभलेले भाग्यवंत आहेत. ते आजही शिवसेनेत असते तर कदाचित कधीच मुख्यमंत्री झाले असते, असं प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी आज केलं.

Oct 13, 2022, 03:11 PMIST

Rutuja Latke: ऋतुजा लटके यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. लटके यांची याचिका सुनावणीयोग्य नाही, असा युक्तिवाद महापालिकेतर्फे करण्यात आला आहे. नोटीसचा कालावधी शिथील करून महापालिकेनं राजीनामा स्वीकारावा, असे आदेश देण्याची मागणी लटके यांनी केली आहे. 

Oct 13, 2022, 02:42 PMIST

Andheri Bypoll : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजप-शिंदे गटाची आज रात्री बैठक

Andheri Bypoll Election 2022 : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाची आज रात्री बैठक होणार असून त्यात उमेदवाराची निवड करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली आहे. त्यामुळं आता मूरजी पटेल यांची उमेदवारी फिक्स होणार की ऐनवेळी दुसऱ्या नेत्याला उमेदवारी मिळणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.

Oct 13, 2022, 02:26 PMIST

Andheri Bypoll : अंधेरीत ऋतुजा लटकेंना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणू; नाना पटोलेंची दावा

Shinde vs Thackeray In Andheri Bypoll : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसनं शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटकेंना पाठिंबा दिला आहे. देशात सध्या जी परिस्थिती आहे ती पाहता एकत्र येऊन निवडणुका लढल्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगत अंधेरीत शिवसेनेच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्यानं निवडून आणू, असा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Oct 13, 2022, 11:45 AMIST

Mumbai Traffic: प्रतीक्षा नगर ते समाज मंदिर हॉल रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा सुरू

प्रतीक्षा नगर ते समाज मंदिर हॉलच्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामासाठी बंद करण्यात आलेला रस्ता आजपासून पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळं बस क्रमांक १४, १५, ८८, १६९, १७२, २५५, ३४८, ३१२ या गाड्या कोकरीमार्गे न जाता प्रतीक्षा नगर सुंदर विहार हॉटेल मार्गे धावतील, अशी माहिती प्रशासनानं दिली आहे.

Oct 13, 2022, 11:22 AMIST

जिल्ह्यात सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ३५ कोटींचे वितरण

पुणे : जिल्ह्यात सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना सर्वसाधारण या दोन योजनांच्या एकूण ६८ हजार ९७१ लाभार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये जमा करण्यासाठी ३५ कोटी ३९ लक्ष २ हजार १०० रुपये अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले आहे.

Oct 13, 2022, 09:23 AMIST

Stock Market: शेअर बाजाराची पुन्हा निराशाजनक सुरुवात

बुधवारी सावरलेल्या शेअर बाजारानं आज पुन्हा मान टाकली आहे. बाजारातील व्यवहारांची सुरुवात निराशाजनक झाली आहे. सेन्सेक्स १०० हून अधिक अंकांनी घसरला आहे.

Oct 13, 2022, 07:24 AMIST

andheri east bypoll : ऋतुजा लटकेंची बीएमसीविरोधात हायकोर्टात धाव, आज ११ वाजता होणार सुनावणी

rutuja latke resignation : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महापालिकेनं अद्यापही स्वीकारलेला नसल्यानं त्यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळं या प्रकरणात कोर्ट काय निर्णय देणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Oct 13, 2022, 07:23 AMIST

Uddhav Thackeray : तुषार गांधींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Uddhav Thackeray : राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पणतू आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी ठाकरेंसोबत राजकीय चर्चा केल्याचं समजतं. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी त्यांना नफरत छोडो आणि संविधान बचाव अभियानायात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

Oct 13, 2022, 07:17 AMIST

Hijab Controversy : कर्नाटकातील हिजाब प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

hijab case supreme court : शाळा आणि महाविद्यालयामध्ये गणवेशाच्या नियमांचे पालन करण्याचा निकाल कर्नाटक हायकोर्टानं हिजाब प्रकरणात दिला होता. त्यानंतर याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आज या प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

Oct 13, 2022, 07:10 AMIST

Rain Updates : राज्यात परतीच्या पावसाचा कहर; या भागांत यलो अलर्ट

Maharashtra Rain : गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं काल राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार बॅटिंग केली आहे. त्यामुळं हवामानाची संभावित स्थिती लक्षात घेता हवामान खात्यानं विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी केला आहे.

    शेअर करा