मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 05 October Live: भारतीयांना कझाकस्तानमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळणार
Raj Bhavan

Marathi News 05 October Live: भारतीयांना कझाकस्तानमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळणार

Oct 05, 2022, 05:39 PMIST

Marathi News Live Updates: मध्य आशियातील प्रमुख देश असलेल्या कझाकस्थाननेभारतीयांकरिताव्हिसा मुक्त प्रवेश धोरण स्वीकारलं आहे.

Oct 05, 2022, 05:38 PMIST

Kazakhstan: भारतीयांना कझाकस्तानमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळणार

 भारतीय पर्यटकांना कझाकस्थानला १४ दिवसांपर्यंत व्हिसाशिवाय भेट देता येणार असल्याचं कझाकस्थान गणराज्याचे भारतातील राजदूत नूरलान झालगसबायेव्ह यांनी सांगितलं. कझाकस्थान मुंबईत स्वतंत्र वाणिज्य दूतावास सुरू करण्याबाबत देखील विचार करीत असल्याचं त्यांनी सांगितलं. कझाकस्तानच्या राजदूतांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

Oct 05, 2022, 03:11 PMIST

Pankaja Munde Dasara Melava: पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर गोंधळ, पोलिसांचा लाठीमार

 बीडमधील सावरगाव इथं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात गोंधळ झाला. पंकजा यांचं भाषण झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी व्यासपीठाकडं धाव घेतली. त्यामुळं प्रचंड गर्दी होऊन गोंधळ उडाला. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. 

Oct 05, 2022, 02:31 PMIST

Sea Link Accident: सी लिंकवरील अपघाताची चौकशी सुरू असून योग्य ती कारवाई केली जाईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वांद्रे-वरळी सी-लिंक वर झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अपघाताची अधिक चौकशी सुरू असून पुढील कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Oct 05, 2022, 02:00 PMIST

Bharat Rashtra Samiti: केसीआर यांनी केली भारत राष्ट्र समिती या पक्षाची घोषणा

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रीय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला असून भारत राष्ट्र समिती या राष्ट्रीय पक्षाची घोषणा केली आहे. नव्या पक्षाची घोषणा करण्याआधी केसीआर यांनी विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची भेट घेतली होती.

Oct 05, 2022, 01:26 PMIST

Mulayam Singh Yadav: समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक

समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. ते सध्या व्हेंटिलेटरवर असून तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती मेदांता रुग्णालयानं दिली आहे.

Oct 05, 2022, 10:56 AMIST

Jammu Kashmir: पोलीस महासंचालकांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली महत्त्वाची बैठक

जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज श्रीनगरमध्ये उच्चस्तरीय बैठक घेऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

Oct 05, 2022, 09:23 AMIST

महिलांशिवाय समाज प्रगती करू शकत नाही : सरसंघचालक

आपण महिला सशक्तीकरण केलं पाहिजे. महिलांशिवाय समाज प्रगती करू शकत नाही असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. नागपुरात विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संचलन झाले. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले.

Oct 05, 2022, 07:52 AMIST

मुख्यमंत्री शिंदे पहाटे तीन वाजता पोहोचले बीकेसी मैदानात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटे ३ वाजता बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने एसटी बसेसची व्यवस्था केली असून त्यासाठी १० कोटी रुपये मोजले आहेत. तसंच मेळाव्यासाठी येणाऱ्या गाड्यांच्या पार्किंगसाठी १० मैदाने बूक केली आहेत.

Oct 05, 2022, 07:48 AMIST

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून २५ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये पौडी गढवाल इथं बस ५०० फूट दरीत कोसळून दुर्घटना घडली. काल रात्री नऊच्या सुमारास घडलेल्या या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. बसमधून ४० ते ५० प्रवाशी प्रवास करत होते अशी माहिती समजते.

Oct 05, 2022, 07:57 AMIST

सी लिंकवर भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू

मुंबईत वांद्रे वरळी सी लिंकवर चार कार आणि रुग्णवाहिकेची धडक झाली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    शेअर करा