मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 05 December 2022 Live : लालू यादव यांच्यावरील किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
Live Blog

Marathi News 05 December 2022 Live : लालू यादव यांच्यावरील किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

Dec 05, 2022, 03:51 PMIST

Live Updates Daily News : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावरील किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.

Dec 05, 2022, 03:43 PMIST

Laluprasad Yadav: लालू प्रसाद यादव यांच्यावरील किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावरील किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. मुलगी रोहिणी हिनं त्यांना किडनी दान केली. लालू यादव सध्या सिंगापूरमध्ये उपचार घेत आहेत. लालूंचे सुपुत्र तथा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी वडिलांचं ऑपरेशन यशस्वी झाल्याची माहिती दिली आहे.

Dec 05, 2022, 10:21 AMIST

Sanjay Raut: राज्यपालांवर कारवाई करावीच लागेल - संजय राऊत

राज्यपालांवर कारवाई करावीच लागेल. लवकरच हिवाळी अधिवेशन सुरू होतंय. त्याआधी कारवाई झाली नाही तर विरोधक काय करतील, हे तुम्ही पाहाच, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना 'अरे ला'... 'का रे' करा. राजभवनात जाऊन 'का रे, आमच्या महाराजांचा अपमान केला', असं विचारा, असं आव्हान भाजप व शिंदे गटाला दिलं.

Dec 05, 2022, 10:13 AMIST

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्र्यांनी केले मतदान; ९ वाजेपर्यंत ४.६३ टक्के मतदान

Gujarat Election 2022 : गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सकाळी ९ वाजे पर्यन्त ४.६३ टक्के मतदानाची नोंद झाली. दोहादमध्ये ३.३७ टक्के, पाटन मध्ये ४.४३ टक्के, बनासकांठा येथे ५.३६ टक्के, वडोदरात ४.१५ टक्के तर मेहसाणात ५.४४ टक्के मतदान झाले. अहमदाबादमध्ये ४.२० टक्के मतदान झाले. तर गांधी नगरमध्ये ७.५ टक्के मतदान झाले.

Dec 05, 2022, 10:04 AMIST

Sensex Update: मुंबई शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ३०० अंकांनी कोसळला

मुंबई शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. पहिल्या सत्रात सेन्सेक्स ३०० हून अधिक अंकांनी घसरला आहे. तर, निफ्टीतही घसरण झाली आहे.

Dec 05, 2022, 08:34 AMIST

नायजेरियात मशिदीवर हल्ला; १२ ठार

नायजेरियात एका मशिदीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून या घटनेत इमामसह १२ जण ठार झाले आहेत. दहशतवाद्यांनी काही नागरिकांना बंदी देखील बनवले आहेत.

Dec 05, 2022, 08:03 AMIST

India G20 Summit 2023 : जी 20 समिटसाठी आज केंद्र सरकारची सर्व पक्षीय बैठक

 भारत (India) पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये G-20 शिखर परिषदेचेअध्यक्षपद भूषवणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. बैठकीत सर्व पक्षांच्या सूचना घेतल्या जाणार आहेत.

Dec 05, 2022, 08:03 AMIST

Dec 05, 2022, 07:40 AMIST

Ratnagiri News : आमदार वैभव नाईक आज चौकशीसाठी रत्नागिरीतील एसीबी कार्यालयात हजर राहणार

 ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आज एसीबी कार्यालयात हजर राहणार आहे. सकाळी ११  ते १२  या दरम्यान वैभव नाईक रत्नागिरीमधील एसीबी कार्यालयात पोहोचतील.  

Dec 05, 2022, 07:39 AMIST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची पहिली बैठक आज

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे   यांच्यात आज सकाळी बैठक पार पडणार  आहे. या  महाविकास आघाडीच्या बैठकीला ठाकरे गटातील नेते उपस्थित राहणार का हा   सवाल उपस्थित होत आहे.

Dec 05, 2022, 07:29 AMIST

Marathi News 05 December 2022 Live : गुजरात निवडणुकीचा दूसरा टप्याचे आज मतदान; तब्बल ८३३ उमेदवार रिंगणात

Gujrat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज ५ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १४ जिल्ह्यातील तब्बल ९३ जागांवर हे मतदान होत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मतदान करण्याची शक्यता आहे.

    शेअर करा