मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Pandey: माजी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ‘या’ प्रकरणी ईडीकडून अटक

Sanjay Pandey: माजी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ‘या’ प्रकरणी ईडीकडून अटक

Jul 19, 2022, 08:56 PM IST

    • मुंबई शेअर मार्केट (NSE) मधील  कर्मचाऱ्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी संजय पांडे यांना ईडीने अटक केली आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणात संजय पांडे यांची ईडीकडून चौकशी सुरू असून ईडीने त्यांना आज दिल्लीमध्ये अटक केली आहे.
माजी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे

मुंबई शेअर मार्केट (NSE) मधीलकर्मचाऱ्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी संजय पांडे यांना ईडीने अटक केली आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणात संजय पांडे यांची ईडीकडून चौकशी सुरू असून ईडीने त्यांना आज दिल्लीमध्ये अटक केली आहे.

    • मुंबई शेअर मार्केट (NSE) मधील  कर्मचाऱ्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी संजय पांडे यांना ईडीने अटक केली आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणात संजय पांडे यांची ईडीकडून चौकशी सुरू असून ईडीने त्यांना आज दिल्लीमध्ये अटक केली आहे.

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे ( Sanjay pandey) यांना ईडीने अटक केली आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणात संजय पांडे यांची ईडीकडून चौकशी सुरू असून ईडीने त्यांना आज दिल्लीमध्ये अटक केली आहे. एनएसई कर्मचाऱ्यांचे फोन टॅपिंग प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

boy died in leopard attack : मामाच्या गावी आलेल्या ८ वर्षीय मुलासोबत अघटित घडलं! बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

chicken shawarma news : धक्कादायक! मुंबईत रस्त्यावरील निकृष्ट चिकन शॉर्मा खाल्ल्याने एकाचा मृत्यू; दोघांना अटक

Palghar Crime: आधी सोशल मीडियावरून केली मैत्री, नंतर भेटायला बोलावून केले कांड! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मेट्रिमोनियल साईटवरून तब्बल २२ मुलींची फसवणूक तर ७ तरुणींना लग्न करून गंडवले, आरोपीला अटक

मुंबई शेअर मार्केट (NSE) मधील  कर्मचाऱ्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी संजय पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. संजय पांडे यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅप केला होता, असा त्यांच्यावर आरोप होता.

संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ते राज्याचे पोलीस महासंचालक देखील होते. पण काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबींमुळे त्यांची पोलीस महासंचालक पदावरुन मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. ३०  जून २०२२ रोजी ते मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन निवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. ईडीने आज पांडे यांची चौकशी केली. या चौकशीनंतर ईडीने पांडे यांना अटक केली आहे.

संजय पांडे ३० जून २०२२ रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांच्या आत त्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. निवृत्तीनंतर अटक होणारे संजय पांडे हे तिसरे मुंबई पोलीस आयुक्त आहेत. 

संजय पांडे यांच्या कंपनीने जवळपास आठ वर्षे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती सीबीआयला (CBI) मिळाली आहे. संजय पांडे यांच्या  iSEC (आयसेक) सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करून हे फोन टॅप केल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीने केला आहे. 

एनएसई घोटाळा काय आहे ?

NSE घोटाळा प्रकरणी  कंपनीचे टॉप मॅनेजमेंटमधील अधिकारी चित्रा रामकृष्ण, रवी नारायण आणि आनंद्र सुब्रमण्यम यांना आरोपी बनवण्यात आलं होतं. तपासादरम्यान संजय पांडे यांच्या आयसेक नावाच्या कंपनीने ९१ कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याचं उघड झालं होतं. या फोन टॅपिंगसाठी संजय पांडे यांच्या कंपनीने चित्रा रामकृष्ण आणि इतर मॅनेजमेंटने ४ कोटी ४५ लाख रुपये संजय पांडे यांना दिले होते. याशिवाय २० कोटींचे संशयास्पद व्यवहार आयसेक कंपनीतून झाल्याचं उघड झालं होतं. याचबाबत ईडीकडून तपास सुरु होता.

संजय पांडे यांनी दोन दशकांपूर्वी पोलीस सेवेतून निवृत्त होण्यासाठी राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी २००१ मध्ये स्वत:चं आयटी ऑडिट फर्म सुरु केलं होतं. या दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नव्हता. त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत हजर राहावं लागलं. त्यावेळी संजय पांडे यांनी आपली आई आणि मुलाला फर्मचं संचालक केलं होतं. या फर्मचं Isec Services Pvt Ltd असं नाव होतं. या फर्मला NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. त्यावेळी फर्मने दिलेल्या अहवालात कोणतंही उल्लंघन झालेलं नाही, असा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरुन CBI ने फर्मची चौकशी सुरु केली होती. या प्रकरणी आता ईडीदेखील चौकशी करत आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा