मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : शिंदे गटातल्या 'त्या' दोन आमदारांच्या हालचाली संशयास्पद

Eknath Shinde : शिंदे गटातल्या 'त्या' दोन आमदारांच्या हालचाली संशयास्पद

Jun 23, 2022, 04:55 PM IST

  • एकदा आमदार रॅ़डिसन हॉटेलच्या (Hotel Radison) आत गेला की नंतर त्यांना बाहेर येताना कोणीही पाहिलेलं नाही. सर्व आमदारांची (MLA) माळलेली मोट घट्ट राहावी, ती सुटू नये हा त्यामागचा उद्देश असल्याचं समजतं. मात्र दुसरीकडे काल रात्री याच आमदारांपैकी दोन आमदार एका गाडीत बसून बाहेर फिरून आल्याची माहिती मिळतेय.

शिंदे गटातल्या त्या दोघांच्या हालचाली संशयास्पद (हिंदुस्तान टाइम्स)

एकदा आमदार रॅ़डिसन हॉटेलच्या (Hotel Radison) आत गेला की नंतर त्यांना बाहेर येताना कोणीही पाहिलेलं नाही. सर्व आमदारांची (MLA) माळलेली मोट घट्ट राहावी, ती सुटू नये हा त्यामागचा उद्देश असल्याचं समजतं. मात्र दुसरीकडे काल रात्री याच आमदारांपैकी दोन आमदार एका गाडीत बसून बाहेर फिरून आल्याची माहिती मिळतेय.

  • एकदा आमदार रॅ़डिसन हॉटेलच्या (Hotel Radison) आत गेला की नंतर त्यांना बाहेर येताना कोणीही पाहिलेलं नाही. सर्व आमदारांची (MLA) माळलेली मोट घट्ट राहावी, ती सुटू नये हा त्यामागचा उद्देश असल्याचं समजतं. मात्र दुसरीकडे काल रात्री याच आमदारांपैकी दोन आमदार एका गाडीत बसून बाहेर फिरून आल्याची माहिती मिळतेय.

Eknath Shinde : एकीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुवाहाटीच्या हॉटेल रॅडिसनला (Hotel Radison) आपलं हेड ऑफिस (Head Office) बनवलं आहे. तिथून आजवर त्यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार (MLA) असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानं महाविकास आघाडीचं तोंडचं पाणी पळवलं आहे. आजवर एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदारांची संख्या रोज वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार हॉटेलच्या आत येताना आणि एकनाथ शिंदे यांना आपलं समर्थन देताना पाहायला मिळाले होते. एकदा आमदार रॅ़डिसन हॉटेलच्या आत गेला की नंतर त्यांना बाहेर येताना कोणीही पाहिलेलं नाही. सर्व आमदारांची माळलेली मोट घट्ट राहावी ती सुटू नये हा त्यामागचा उद्देश असल्याचं समजतं. मात्र दुसरीकडे काल रात्री याच आमदारांपैकी दोन आमदार एका गाडीत बसून बाहेर फिरून आल्याची माहिती मिळतेय.

ट्रेंडिंग न्यूज

PDCC Bank : बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

Jalgaon Accident: जळगावमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, भीषण अपघातात महिलेसह तीन मुलांचा मृत्यू

Lok Sabha Election : राज्यात दोन ठिकाणी मतदान केंद्राबाहेरील रांगेतच दोघांनी सोडला जीव, नेमकं काय झालं?

Kolhapur News : धुणं धुण्यासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला! हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना

शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर आणि आशिष जैस्वाल हे दोन आमदार काल इनोव्हा या गाडीत बसून हॉटेल रॅडिसनच्या बाहेर गेले होते अशी बातमी आता समोर येत आहे. या बातमीने आता उलटसुलट चर्चांना उधाण आल्याचंही पाहायला मिळतंय. जिथं आजवर एकही आमदार रॅडिसन हॉटेलच्या गेटवर सुद्धा आले नाहीत, तिथंच हे दोघे इनोवा कारमध्ये बसून गुवाहाटी शहरात गेले. मात्र हे दोघं बाहेर का गेले हे कुणाला माहीत नाही

गुवाहाटी इथे एकीकडे शिंदे समर्थकांमध्ये आनंद पाहायला मिळतोय तर दुसरीकडे मात्र आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी शिवसेनेचे काही आमदार मुद्दाम गुवाहाटी इथं गेल्याचं सांगितलंय. जे आमदार शिंदे गटात सहभागी होण्यासाठी गेले आहेत त्यांच मन परिवर्तन करण्यासाठी शिवसेनेचे काही आमदार तिथं गेले असावेत असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे.सध्या गुवाहाटीत दाखल झालेले आमदार शिंदे गटासोबत संवाद साधत असावेत, तिकडे नेमकं काय सुरू आहे, याचा अंदाज घेण्यासाठी गेले असावेत. नेमकं ठोस सांगता येणार नाही, असेही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. 

त्यामुळेच एकीकडे शिंदे गटाचा एकही आमदार रॅडिसन हॉटेलच्या गेटच्या आसपासही दिसत नसताना दुसरीकडे मात्र दीपक केसरकर आणि आशिष जैस्वाल यांनी शहराचा मारलेला फेरफटका नक्कीच संशयाच्या भोवऱ्यात आलेला पाहायला मिळत आहे.