मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनास जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेकडून खुशखबर

शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनास जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेकडून खुशखबर

Mar 27, 2023, 07:06 PM IST

  • Railway Stop of shegaon : शेगाव मार्गे जाणाऱ्या नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अन्य तीन एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगित तत्त्वावर सहा महिने शेगाव स्टेशनवर स्टॉप देण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे.

Railway Stop of shegaon

Railway Stop of shegaon : शेगाव मार्गे जाणाऱ्यानागपूर-पुणे एक्स्प्रेससह अन्य तीन एक्स्प्रेस गाड्यांनाप्रायोगित तत्त्वावर सहा महिने शेगावस्टेशनवर स्टॉप देण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे.

  • Railway Stop of shegaon : शेगाव मार्गे जाणाऱ्या नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अन्य तीन एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगित तत्त्वावर सहा महिने शेगाव स्टेशनवर स्टॉप देण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे.

विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी एक खुशखबर आहे. गजानन महाराजांच्या मंदिरात दररोज हजारो भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येत असतात. मंदिर प्रशासनाकडूनअनेक उत्सवांचे आयोजन केले जाते. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रामनवमीचा उत्सवानिमित्त अनेक भाविक शेगावला येत असतात. त्यांच्यासाठी मध्य रेल्वेने खास घोषणा केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Jalgaon Accident: जळगावमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, भीषण अपघातात महिलेसह तीन मुलांचा मृत्यू

Lok Sabha Election : राज्यात दोन ठिकाणी मतदान केंद्राबाहेरील रांगेतच दोघांनी सोडला जीव, नेमकं काय झालं?

Kolhapur News : धुणं धुण्यासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला! हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना

Supriya Sule : आता हे काय नवीन? बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी

शेगाव मार्गे जाणाऱ्या नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अन्य तीन एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगित तत्त्वावर सहा महिने शेगाव स्टेशनवर स्टॉप देण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. हा निर्णय प्रायोगित तत्वावर घेतला असला तरी प्रवाशांच्या प्रतिसादानुसार भविष्यात कायमस्वरूपी केला जाऊ शकतो.

नागपूर- पुणे-नागपूर एक्स्प्रेस (२२१४१/२२१४२) ही एक्सप्रेस येत्या ३१ मार्चपासून शेगावला थांबणार आहे. अमृतसर-नांदेड एक्स्प्रेसला २८ मार्चापासून, तर १२४२१ नांदेड-अमृतसर एक्स्प्रेसला २९ मार्च पासून शेगाव स्टेशनवर स्टॉप असेल. जम्मु तावी-नांदेड हमसफर (१२७५२) एक्स्प्रेस २७ मार्चपासून, नांदेड-जम्मुतावी हमसफर(१२७५१) ही गाडी ३१ मार्चपासून शेगाव स्थानकावर थांबणार आहे.

 

या गाड्यांना पुढील सहा महिने शेगाव रेल्वे स्टेशनवर थांबा असेल. गजानन महाराज संस्थान मध्ये रामनवमी उत्सवास सुरूवात झाली असून यामध्येविविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रामनवमी उत्सवा दरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातुन शेकडो दिंड्या शेगावात दाखल होत असतात. दरवर्षी भाविकांची होणारी प्रचंड गर्दी बघता मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलाआला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा