मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Koshyari: वाद ओढवून घेण्याची कोश्यारींची ही पहिलीच वेळ नाही; ही यादी पाहा!

Koshyari: वाद ओढवून घेण्याची कोश्यारींची ही पहिलीच वेळ नाही; ही यादी पाहा!

Jul 30, 2022, 11:54 AMIST

Bhagat Singh Koshyari and Controversy: वादग्रस्त विधानं करून चर्चेत राहण्याची भगतसिंह कोश्यारी यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेकदा वाद ओढवून घेतला आहे. त्याविषयी…

  • Bhagat Singh Koshyari and Controversy: वादग्रस्त विधानं करून चर्चेत राहण्याची भगतसिंह कोश्यारी यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेकदा वाद ओढवून घेतला आहे. त्याविषयी…
भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतंच केलेलं वक्तव्य वादाचा विषय ठरलं आहे. मुंबई व महाराष्ट्राबद्दल त्यांनी हे वक्तव्य केलं. गुजराती व राजस्थानी लोक मुंबईबाहेर गेले तर इथं पैसाच राहणार नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. त्यातून अप्रत्यक्षपणे मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न केला गेलाय. त्यामुळं राजकीय गदारोळ सुरू झाला आहे.
(1 / 5)

'आपल्या समाजात गुरूला मोठं स्थान असतं. महाराज, चक्रवर्ती अनेक झाले. पण, चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारणार? समर्थ रामदासांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? समर्थांच्याच कृपेनं शिवाजी महाराजांना राज्य मिळालं होतं, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते. कोश्यारी यांच्या या विधानाला इतिहासकारांनी जोरदार आक्षेप घेतला होता. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व कमी लेखण्याचा व रामदासांना त्यांचे गुरू म्हणून थोपवण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका काही इतिहासकार व अभ्यासकांनी केली होती.
(2 / 5)

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलतानाही भगतसिंह कोश्यारी यांची जीभ घसरली होती. सावित्रीबाईंचं लग्न वयाच्या दहाव्या वर्षी झालं. तेव्हा त्यांचे पती १३ वर्षांचे होते, असं सांगून, लग्न झाल्यावर मुलगा-मुलगी काय करतात?, असा प्रश्न त्यांनी हसत हसत विचारला होता. त्यावरूनही राज्यात मोठा गदारोळ झाला होता.
(3 / 5)

कोश्यारी हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत. तिथल्या राजकारणात ते एक वजनदार नेते म्हणून प्रसिद्ध होते. मात्र, तिथंही त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली होती. कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्यावर एका सभेत एकेरी भाषेत टीका केली होती. तसंच, बहुगुणा नेमके कोण आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी डीएनए टेस्ट करावी, असं आव्हान त्यांनी दिलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. 
(4 / 5)

पुण्यातील एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते सायकलपटूंचा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी फोटो काढताना राज्यपालांनी महिलेच्या तोंडावरचा मास्क स्वत:च्या हातांनी खाली खेचला होता. राज्यात करोनाचा संसर्ग वाढत असतानाचे ते दिवस होते. प्रत्येकानं मास्क घालावं, असं मुख्यमंत्री व पंतप्रधान सतत सांगत होते. असं असतानाही राज्यपालांनी हे कृत्य केल्यामुळं त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.
(5 / 5)

    शेअर करा