मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाने जुहूमध्ये खरेदी केला आलिशान बंगला, या दिग्दर्शकाची झाली शेजारीण

Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाने जुहूमध्ये खरेदी केला आलिशान बंगला, या दिग्दर्शकाची झाली शेजारीण

Aarti Vilas Borade HT Marathi

May 30, 2023, 03:33 PM IST

    • Urvashi Rautela: गेल्या तीन महिन्यांपासून उर्वशीच्या घराचे काम सुरु होते. उर्वशीने स्वत:च्या पसंतीने घराचे रिनोवेशन केले आहे.
Urvashi Rautela (HT_PRINT)

Urvashi Rautela: गेल्या तीन महिन्यांपासून उर्वशीच्या घराचे काम सुरु होते. उर्वशीने स्वत:च्या पसंतीने घराचे रिनोवेशन केले आहे.

    • Urvashi Rautela: गेल्या तीन महिन्यांपासून उर्वशीच्या घराचे काम सुरु होते. उर्वशीने स्वत:च्या पसंतीने घराचे रिनोवेशन केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिने जिंकलेल्या किताबामुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. सध्या उर्वशीने खरेदी केलेल्या नव्या घरामुळे चर्चा रंगल्या आहेत. उर्वशीचे हे नवे घर बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या शेजारी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विनोदाची पातळी इतकी खाली गेलीये? कुशल बद्रिके आणि हेमांगी कवीच्या ‘मॅडनेस मचायेंगे’वर संतापले प्रेक्षक

तेजश्री प्रधानच्या मालिकेने पुन्हा मारली बाजी! जुई गडकरी ठरली नंबर वन! पाहा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट

एक-दोन नव्हे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा ‘सोढी’ वापरत होता १० बँक अकाऊंट! पोलिसांनी केला नवा खुलासा

अभिराम जाहिरातीसाठी तयार होणार; पण दुर्गाचं सत्य समोर येणार? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत रंजक वळण

उर्वशीने मुंबईतील जुहू येथे नवा बंगला खरेदी केला आहे. उर्वशीचा हा नवीन बंगला बॉलीवूडचे दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्या बंगल्याच्या शेजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. आदित्य चोप्रा यांच्या आई पामेला चोप्रा या आपल्या निधनापूर्वी या बंगल्यात राहत होत्या.

ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून उर्वशी नव्या घराच्या शोधात होती. तिने यापूर्वी लोखंडवाला येथे सेलेस्ट नावाचा बंगला खरेदी केला होता. मात्र, ती काही कारणास्तव या बंगल्यात राहण्यासाठी गेली नाही. आता तिने जुहू येथे नवा बंगला खरेदी केला आहे. या बंगालचे उर्वशीने स्वत:च्या मनाने इंटिरेटीअर केले आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तिच्या घराचे काम सुरु होते.

बॉलीवूडचे दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या बंगल्याच्या शेजारी उर्वशीचा नवीन बंगला आहे. यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा या आपल्या निधनापूर्वी या बंगल्यात राहत होत्या. २० एप्रिलला पामेला चोप्रा यांचे निधन झाले.

विभाग