मराठी बातम्या  /  निवडणुका  /  VBA Candidate List : वंचितकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, ५ जागांसाठी घोषणा, वसंत मोरेंना पुण्यातून उमेदवारी

VBA Candidate List : वंचितकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, ५ जागांसाठी घोषणा, वसंत मोरेंना पुण्यातून उमेदवारी

Apr 02, 2024, 09:25 PM IST

  • Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात वसंत मोरे यांना पुण्यातून तिकीट देण्यात आली आहे.

वंचितकडून  उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात वसंत मोरे यांना पुण्यातून तिकीट देण्यात आली आहे.

  • Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात वसंत मोरे यांना पुण्यातून तिकीट देण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण ५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये पुणे मतदारसंघासाठी मनसेचा राजीनामा दिलेले वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिरूर मंगलदास बांदल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारामतीमध्ये वंचितने उमेदवार न देता सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Uddhav Thackeray: …अन्यथा तुमचे शटर बंद करू; मराठी माणसांना नोकरी नाकारणाऱ्या कंपनीला उद्धव ठाकरेंचं अल्टिमेटम!

Viral Video: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला धमकावणाऱ्या आमदाराचा व्हिडिओ व्हायरल, निवडणूक आयोगाकडे तक्रार!

Devendra Fadnavis: धुळ्यात देवेंद्र फडणवीस यांना दाखवले काळे झेंडे, प्रलंबित प्रश्नांवरून आदिवासी, कोळी बांधव आक्रमक!

Summon to BJP chief Nadda: वादग्रस्त व्हिडिओप्रकरणी भाजप अध्यक्ष जेपी नड्डांना पोलिसांनी बजावली नोटीस

याआधी वंचितने पहिल्या यादीत एकूण ८ जागांचा समावेश होता. तर दुसऱ्या यादीमध्ये ११ जागांचा समावेश करण्यात आला होता. आतापर्यंत वंचितने २४ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. तिसऱ्या यादीत उमेदवारांच्या नावापुढे त्यांची जातीचाही उल्लेख करण्यात आला आहे. यात तीन उमेदवार मराठा उमेदवार आहेत तर एक लिंगायत तर एक मुस्लिम आहे.

वंचितची तिसरी उमेदवार यादी –

नांदेड – अविनाश भोईकर -लिंगायत

परभणी – बाळासाहेब भुजंगराब उगळे – मराठा

औरंगाबाद -अफसर खान – मुस्लिम

पुणे – वसंत मोरे – मराठा

शिरुर - मंगलदास बांदल - मराठा

 

मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे (Vasant More) यांनी अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. पुणे लोकसभेसाठी इच्छूक असलेले मोरे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मोरे यांनी वंचित (Vanchit Bahujan Aghadi) चे समर्थन मिळवण्यासाठी मुंबईत प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. जरांगे यांनी मराठा समाजाचे उमदेवार देण्याबाबत घुमजाव केल्यानंतर आता पुण्यातून वंचितकडून मोरे यांना उमेदवारी मिळाली आहे.