मराठी बातम्या  /  निवडणुका  /  MVA Seat Sharing: महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला, वंचित लोकसभेच्या ७ जागांवर लढणार?

MVA Seat Sharing: महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला, वंचित लोकसभेच्या ७ जागांवर लढणार?

Mar 17, 2024, 06:16 PM IST

    • Vanchit Vahujan Aghadi Lok Sabha seats: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला ७ जागा देण्यात आल्याची माहिती आहे.
MahaVikas Aghadi

Vanchit Vahujan Aghadi Lok Sabha seats: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला ७ जागा देण्यात आल्याची माहिती आहे.

    • Vanchit Vahujan Aghadi Lok Sabha seats: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला ७ जागा देण्यात आल्याची माहिती आहे.

MahaVikas Aghadi Seat Sharing: महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. महाविकास आघाडीत वंचितला एकूण ७ जागा देण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मध्यस्तीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Rahul Gandhi : 'मोदींच्या हातातून निवडणूक निसटलीय, येत्या ४- ५ दिवसात ते...', राहुल गांधीनी तरुणांना केलं सावध

Sanjay Raut : अमित शहा येणार का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करू, संजय राऊतांचा खोचक टोला

Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरे यांच्या बेधडक मुलाखतीचा टीझर सोशल मीडियावर लॉन्च!

Sharad Pawar: राज्यात महाविकास आघाडीला ३०-३५ जागा मिळणार; शरद पवार यांचं साताऱ्यात वक्तव्य

महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, हा प्रस्ताव वंचित आघाडीने फेटाळून लावला. यानंतर महाविकास आघाडीने आता वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव देण्यात येणार नाही. दिलेल्या प्रस्तावावर वंचित बहुजन आघाडीनेच निर्णय घ्यायचा आहे, असे स्पष्ट केले. मात्र, राहुल गांधीच्या मध्यस्तीनंतर वंचितला ७ जागा देण्यात आल्या आहेत, असे समजत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा होणार आहे.या सभेतून राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे. या निमित्ताने काँग्रेसचे केंद्रीय नेते आज मुंबईत दाखल झाले आहेत. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पहिला टप्पा १९ एप्रिल, दुसरा टप्पा २६ एप्रिल, तिसरा टप्पा ७ मे, चौथा टप्पा १३ मे आणि पाचवा आणि शेवटचा टप्पा २० मे रोजी पार पडणार आहे. देशातील ५४३ लोकसभा जागांसाठी १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत ७ टप्प्यात मतदान होणार आहे. तर, ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.