मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Sharad Pawar: राज्यात महाविकास आघाडीला ३०-३५ जागा मिळणार; शरद पवार यांचं साताऱ्यात वक्तव्य

Sharad Pawar: राज्यात महाविकास आघाडीला ३०-३५ जागा मिळणार; शरद पवार यांचं साताऱ्यात वक्तव्य

May 09, 2024, 01:43 PM IST

    • Sharad Pawar press conference Today: सातऱ्यात शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
लोकसभा निवडणूक २०२४: शरद पवार सध्या सातारा दौऱ्यावर आहेत.

Sharad Pawar press conference Today: सातऱ्यात शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

    • Sharad Pawar press conference Today: सातऱ्यात शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) सातारा (Satara) दौऱ्यावर आहे. साताऱ्यातील रतय शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात आज थोर समाजसुधारक तथा रयत संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांची ६५वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली, जिथे शरद पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिस्थळास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ३०-३५ जागा मिळणार असल्याचे वक्तव्य केले.

ट्रेंडिंग न्यूज

Cong manifesto fake Post: काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत चुकीची माहिती पसरवली, गोव्यातील एका व्यक्तीला अटक

Lok Sabha Election 2024 Phase 5: मतदान केंद्र आणि मतदार यादीतील नाव ऑनलाइन कसं शोधायचं? जाणून घ्या सोपी पद्धत

Lok Sabha Elections 2024: पाचव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार संपला, महाराष्ट्रात २० मे रोजी शेवटचं मतदान!

Uddhav Thackeray : कर्नाटकातील प्रज्ज्वल रेवण्णा सारखाच इथलाही उमेदवार आहे, उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?

Uddhav Thackeray: …अन्यथा तुमचे शटर बंद करू; मराठी माणसांना नोकरी नाकारणाऱ्या कंपनीला उद्धव ठाकरेंचं अल्टिमेटम!

शरद पवार म्हणाले की, "देशात तीन टप्प्यात झालेले मतदान मोदींना अस्वस्थ करणारे आहे. लोक भाजपपासून दूर जात असल्याची त्यांना जाणीव झाली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळतील, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे."

Viral Video: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला धमकावणाऱ्या आमदाराचा व्हिडिओ व्हायरल, निवडणूक आयोगाकडे तक्रार!

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यानंतर मोदींनी स्वर बदलला

देशात पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान मोदींना अस्वस्थ करणारे आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपल्यानंतर मोदींनी आपला स्वर बदलला. यानंतर त्यांनी मुस्लीम समाजाचा उघडपणे उल्लेख केला. मोदींना असे वाटत असावे की, धर्मांध विचार घेऊनच मदत होऊ शकते. जसजसे निवडणुकीचे टप्पे पुढे जात आहे, तसेतसे मोदींचे स्थान संकटात जात आहे, अशी भावना भाजप नेत्यांमध्ये असावी, असे माझे निरीक्षण असल्याचे शरद पवार म्हणाले.

Summon to BJP chief Nadda: वादग्रस्त व्हिडिओप्रकरणी भाजप अध्यक्ष जेपी नड्डांना पोलिसांनी बजावली नोटीस

जनतेचे महाविकास आघाडीला समर्थन

२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला एक, राष्ट्रवादी काँग्रेसला चार आणि एमआयएमला एक अशा सहा जागा विरोधकांना मिळाल्या. मात्र, असे चित्र दिसत आहे की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळतील. जनतेकडून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाला समर्थन मिळत आहे, असेही शरद पवार म्हणाले. मात्र, जनतेचा कौल कोणाच्या बाजूने, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

पुढील बातम्या