Devendra Fadnavis: धुळ्यात देवेंद्र फडणवीस यांना दाखवले काळे झेंडे, प्रलंबित प्रश्नांवरून आदिवासी, कोळी बांधव आक्रमक!
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Devendra Fadnavis: धुळ्यात देवेंद्र फडणवीस यांना दाखवले काळे झेंडे, प्रलंबित प्रश्नांवरून आदिवासी, कोळी बांधव आक्रमक!

Devendra Fadnavis: धुळ्यात देवेंद्र फडणवीस यांना दाखवले काळे झेंडे, प्रलंबित प्रश्नांवरून आदिवासी, कोळी बांधव आक्रमक!

May 08, 2024 07:43 PM IST

Devendra Fadnavis shown black flags: प्रलंबित प्रश्नांवरून आदिवासी, कोळी बांधवांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले.

लोकसभा निवडणूक २०२४: भाजप नेते देवेंद्र फडणवीस धुळ्यात प्रचारासाठी जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.
लोकसभा निवडणूक २०२४: भाजप नेते देवेंद्र फडणवीस धुळ्यात प्रचारासाठी जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.

Devendra Fadnavis News: भाजप (BJP) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) बहुमताचा दावा करत असताना धुळ्यात (Dhule) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना काळे झेंडे (Black Flags) दाखवण्यात आल्याची माहिती समोर आली. मागण्या पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ आदिवासी आणि कोळी बांधवांनी रोष व्यक्त केला. फडणवीसांचा ताफा प्रचारासाठी धुळ्यात जात असताना आदिवासी आणि कोळी बांधवांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. फडणवीस यांना काळे झेंडे दाखवणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजत आहे.

Loksabha Poll : मतदानाची टक्केवारी घसरली! तिसऱ्या टप्प्यात ६१.४५ टक्के नागरिकांनी बजावला हक्क; राज्यात इतके टक्के मतदान

नंदुरबार लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस धुळ्यात पोहोचले. मात्र, त्यांचा ताफा शिरपूरमध्ये आला असताना आदिवासी आणि कोळी बांधवांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर आदिवासी कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवू, असे आश्वासन दिले. मात्र, १० वर्षानंतरही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नसल्याच्या निषेधार्थ फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी प्रचंड गोंधळ उडाला. यानंतर पोलिसांनी निषेधकर्त्यांना तात्काळा बाजूला करत ताब्यात घेतले.

Madha Lok Sabha :कांदा BJP ला रडवणार..! 'EVM मशीनवर ठेवला कांदा अन् दाबलं तुतारीचं बटन', शेतकऱ्याचा VIDEO व्हायरल

फडणवीसांचा विरोधकांवर जोरदार घणाघात

देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरूआहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची एकमेकांवर मोठ्या प्रमाणात टिका करताना दिसत आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रावेर लोकसभा महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारसभेतून विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवला.

Baramati Lok Sabha : बारामतीमध्ये पैशांचा पाऊस! मध्यरात्र उलटूनही जिल्हा बँकेचे कामकाज सुरू, रोहित पवारांचा गंभीर आरोप

अडीच वर्ष बिळात राहणारे खिचडीचोर, कफनचोर- फडणवीस

कोरोना काळात अडीच वर्ष घराच्या बिळात घुसून बसले आणि रुग्णांच्या खिचडी आणि कफनमध्ये घोटाळा केला. मात्र, आम्हाला बिळातून बाहेर काढून ठेचण्याची भाषा करतात. परंतु, खऱ्या अर्थाने तुम्हीच खिचडीचोर आणि कफनचोर आहेत, अशा भाषेत फडणवीसांनी महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.  यावर महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्याची प्रतिक्रिया आली नाही.

Whats_app_banner