मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Ajit Pawar : अजित पवारांची डोकेदुखी वाढणार! 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग करणार चौकशी

Ajit Pawar : अजित पवारांची डोकेदुखी वाढणार! 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग करणार चौकशी

Apr 20, 2024, 08:52 AM IST

    • Baramati Lok Sabha Election 2024 : सुनेत्रा पवारांच्या प्रचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेले वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता आहे. त्या वक्तव्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली असून त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे.
अजित पवारांची डोकेदुखी वाढणार! 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग करणार चौकशी

Baramati Lok Sabha Election 2024 : सुनेत्रा पवारांच्या प्रचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेले वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता आहे. त्या वक्तव्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली असून त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे.

    • Baramati Lok Sabha Election 2024 : सुनेत्रा पवारांच्या प्रचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेले वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता आहे. त्या वक्तव्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली असून त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे.

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा निवडणुक प्रचाराचा ज्वर वाढला आहे. येथे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी थेट लढत होत आहे. अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची राहणार आहे. यामुळे त्यांनी बारामती मतदार संघात प्रचाराचा धडका लावला आहे. या दरम्यान, आयोजित सभेत अजित पवार हे त्यांचा ग्रामीण शैलीत भाषण करत असून यामुळे नागरिकांचे चांगलेच मनोरंजन होत असते. मात्र, अशाच एका प्रचार सभेच्या वेळी त्यांनी केलेले व्यक्तव्य आता त्यांना भोवण्याची चिन्ह आहे. कारण निवडणूक आयोगाने याची दखल घेतली असून पवार यांच्या वक्तव्याची चौकशी केली जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Raj Thackeray : मुंबईत मोदी-राज ठाकरेंची ऐतिहासिक सभा; शिवतीर्थावरील रॅलीचा पहिला टिझर आला समोर, Video

मोठी बातमी! 'पंतप्रधान मोदींची मानसिकता बिघडलीय' बोलल्याने संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? भाजपची आयोगाकडे तक्रार

Rahul Gandhi : 'मोदींच्या हातातून निवडणूक निसटलीय, येत्या ४- ५ दिवसात ते...', राहुल गांधीनी तरुणांना केलं सावध

Sanjay Raut : अमित शहा येणार का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करू, संजय राऊतांचा खोचक टोला

Brahmos Missile : 'या' शेजाऱ्याने वाढवलं चिनचं टेन्शन! भारताने पूर्ण केली ब्राह्मोसच्या पहिल्या खेपेची डिलिव्हरी

काय म्हणाले होते अजित पवार

बारामती तालुक्यात एका सभे दरम्यान, बोलतांना अजित पवार म्हणाले होते की, निधी पाहिजे तर कचा-कचा बटण दाबा, आम्हाला मतदान करा नाहीतर, निधीबाबत हात आखडता घ्यावा लागेल. पवार यांच्या याच वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने आता दिले आहेत.

baba ramdev : 'योगातून कमावलेल्या' पैशावर कर भरावा लागणार, सर्वोच्च न्यायालयाचा रामदेव बाबांच्या पतंजलीला आणखी एक झटका

कचाकचा बटण दाबा व मतदान करा

दरम्यान, अजित पवार यांच्या या व्यक्तव्याने विरोधक आक्रमक झाले होते. त्यांनी अजित पवार यांनी निवडणूक आचारसंहीतेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. या बाबतची तक्रार देखील निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने घेतली असून पवार यांच्या या वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Maharashtra Weather Update : कुठे अवकाळीचा अंदाज, तर कुठे उन्हाची काहिली! राज्यात आज असे असेल हवामान

आचार संहितेचे नियम पाळायचे असतात

दरम्यान, अजित पवार यांना त्यांच्या या वक्तव्या बाबत विचारण्यात आले. यावेळी पवार म्हणाले चौकशी करण्याचा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. येणाऱ्या निवडणुकीत मी महायुतीचा धर्म पाळणार हा माझा शब्द आहे. आचार संहितेचे नियम असतात ते पाळायचे असतात मी इंदापूरमध्ये जे बोललो. ते ग्रामीण भाषेत बोललो. जर मी पुण्यात असतो, तर तिथं कचा-कचा नाही चालत. ज्या भाषेत चालतं तसेच बोलावं लागतं, असे पवार म्हणाले.