मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : कुठे अवकाळीचा अंदाज, तर कुठे उन्हाची काहिली! राज्यात आज असे असेल हवामान

Maharashtra Weather Update : कुठे अवकाळीचा अंदाज, तर कुठे उन्हाची काहिली! राज्यात आज असे असेल हवामान

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 20, 2024 06:42 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात तापमान चांगलेच वाढू लागले आहे. पारा ४१ अंशाच्या पुढे गेला आहे. अनेक जिल्ह्यात तापमान वाढीसह पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

कुठे अवकाळीचा अंदाज, तर कुठे उन्हाची काहिली! राज्यात आज असे असेल हवामान
कुठे अवकाळीचा अंदाज, तर कुठे उन्हाची काहिली! राज्यात आज असे असेल हवामान (ANI)

Maharashtra Weather Update : राज्यात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. शुक्रवारी राज्यात अकोला जिल्हा हा सर्वाधिक हॉट ठरला आहे. येथील तापमान ४४ डीग्री सेल्सिअस नोंदवल्या गेले. तर आणि जिल्ह्यांचे तापमान हे ४० चा पुढे गेले आहे. त्यात हवमान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर कुठे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता नोंदवली आहे. मुंबई, व रायगड येथे उष्ण व दमट वातावरणात वाढ होणार असून उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Building Portion Collapses: मुंबईतील दुमजली इमारतीचा काही भाग कोसळला, ३ जण जखमी

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याची चक्रीय स्थिती ही मराठवाडा व लगतच्या भागावर आहे. वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा ही मराठवाडा ते दक्षिण तमिळनाडुपर्यंत जात आहे. कोकणात आज ठाणे. मुंबई, व रायगड येथे उष्ण व दमट वातावरण असेल. तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विजांचा कडकडाट व वादळी वारा वाहील. या ठिकाणी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळीवावाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे रात्री उकाडा जाणवेल. मराठवाड्यात नांदेड, लातूर व उस्मानाबाद येथे पुढील तीन ते चार दिवस व विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली २३ एप्रिल पर्यंत, वर्धा व यवतमाळ येथे आज मेघगर्चना विजांचा कडकडात व वादळी वारा आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Fact Check: शाहरुख खान करतोय काँग्रेसचा प्रचार? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य

पुण्यात असे असेल हवामान

पुणे व परिसरात २२ एप्रिल पर्यंत आकाश अंशत: ढगाळ राहून विजांचा कडकडाटसह पावसाची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस रात्री उकाडा जाणवेल.

अकोला राज्यात सर्वाधिक हॉट; ४४ डीग्री सेल्सिअस तापमानाची नोंद

राज्यात विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. अकोल्यात ४४.० डिग्री सेल्सिअस एवढे तापमान होते. तर अमरावती ४२.८, वर्धा ४२.५, चंद्रपूर ४३.८, यवतमाळ वाशिममध्ये ४३,६, व ४२.५ अंश सेल्सिअसची ऐवधे तापमान होते. अकोला येथे गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी २.७ अंशांनी तापमानात वाढले. मध्य महाराष्ट्रात जळगावमध्ये ४३.२ अंश सेल्सिअस तापमान होते. तर मालेगाव येथे ४२.० तर नगर येथे देखील तापमान ४० अंशांवर होते.

Social Nation 2024: तुमच्या आवडत्या कॉन्टेन्ट क्रिएटरला भेटायचं आहे? मग या भेट द्या 'सोशल नेशन'ला!

मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा

हवामान विभागाने मुंबईसह किनारपट्टीवर तापमानात वाढ होण्याचा अंदाज दिला असून यलो अलर्ट जारी केला आहे. डहाणूत ३६.३, अलिबाग ३४, मुंबई ३३.७ आणि सांताक्रुजमध्ये ३४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे गुजरातवरून येत असल्याने गुजरातमध्ये देखील तापमान वाढलेले होते.

राज्यात या जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आज रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापर, नगर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला होता. त्याचप्रमाणे काही जिल्ह्यांमध्ये गारपीटाचा देखील इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये हलक्या सरी बरसणार आहे.

IPL_Entry_Point