मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sukanya Samruddhi yojana : सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ कोणत्या कररचनेत फायद्याचा? नव्या की जून्या ?

Sukanya Samruddhi yojana : सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ कोणत्या कररचनेत फायद्याचा? नव्या की जून्या ?

Feb 16, 2023, 06:40 PM IST

    • Sukanya Samruddhi yojana : जूनी करप्रणालीमध्ये १ लाख ५० हजारांपर्यंत सूट आहे. तर नव्या करप्रणालीत कोणत्याही प्रकारची सवलत मिळत नाही. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती करप्रणाली फायदेशीर आहे, हे जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
sukanya samruddhi yoajana HT

Sukanya Samruddhi yojana : जूनी करप्रणालीमध्ये १ लाख ५० हजारांपर्यंत सूट आहे. तर नव्या करप्रणालीत कोणत्याही प्रकारची सवलत मिळत नाही. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती करप्रणाली फायदेशीर आहे, हे जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा

    • Sukanya Samruddhi yojana : जूनी करप्रणालीमध्ये १ लाख ५० हजारांपर्यंत सूट आहे. तर नव्या करप्रणालीत कोणत्याही प्रकारची सवलत मिळत नाही. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती करप्रणाली फायदेशीर आहे, हे जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Sukanya Samruddhi yojana : तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी अथवा लग्नासाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.वास्तविक अर्थमंत्री निर्मला सीताारमण यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात नव्या कर प्रणालीत अनेक बदल केले आहेत. या घोषणेनंतर आता सुकन्या समृद्धी योजनेसंदर्भात अनेक गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Govt Savings schemes : दररोज फक्त २५० रुपये गुंतवा आणि २४ लाख मिळवा! ‘ही’ सरकारी योजना तुम्हाला बनवेल लखपती

China Gold Purchase : सोनं महाग होण्यामागे चीनचा हात, नेमकं काय करतोय चिनी ड्रॅगन

Amazon Summer Sale: कडक उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद; एसीच्या खरेदीवर अ‍ॅमेझॉन देतोय ५५ टक्के सूट!

NBFC FD Rates : 'या' पाच वित्तीय कंपन्या एफडीवर देतायत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर

सुकन्या समृद्धी योजनेचे तुम्ही गुंतवणूकदार असाल तर तुमच्यासाठी जूनी कर प्रणाली अधिक फायदेशीर ठरु शकते. या योजनेत ८० सी लिमिट अंतर्गत कर सवलतीचा दावा करु शकतो. जून्या कर प्रणालीत १ लाख ५० हजारांपर्यंत गुंतवणूकीवर सवलत मिळते. या उलट नल्या कर प्रणालीत गुंतवणूकीवर कोणतीही सवलत मिळत नाही. सुकन्या, पीपीएफ सारख्या छोट्या गुंतवणूक योजना कर सवलतीच्या टप्प्यात येतात. एवढेच नाही तर परतावा आणि मच्योरिटी रकमेवर करसवलत दिली जाते. याचाच अर्थ तुम्हाला करमुक्त परतावा मिळतो.

योजनेची माहिती

सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत तुम्ही २५० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. आर्थिक वर्षात अधिकाधिक १.५ लाख रुपये जमा करु शकतात. याअंतर्गत ३ ते १० वर्षांपर्यंत २ मुलींसाठी खाते उघडता येते. या योजनेचा कालावधी २१ वर्षे असून यामध्ये १४ वर्षे पैसे जमा करावे लागतील आणि २१ व्या वर्षी संपूर्ण रक्कम व्याजासह मिळेल. या योजनेत, जर तुम्ही अल्प बचतीद्वारे दरवर्षी मोठी रक्कम कमवू शकता.

समजा, तुम्ही २ वर्षाच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजना खाते उघडले आणि या योजनेत दरमहा सुमारे 4100 रुपये आणि एका वर्षात ५० हजार रुपये जमा केले, तर १४ वर्षांत एकूण ७ लाख रुपये जमा होतील. २१ व्या वर्षी खाते पूर्ण झाल्यावर, तुमच्या मुलीला एकूण २३,४,०७३ रुपये मिळतील. म्हणजे या योजनेत १६ लाखांपेक्षा जास्त व्याज मिळणार आहे.

मोदींचे ट्विट

सुकन्या समृद्धी योजनेत अवघ्या २ दिवसात सुमारे ११ लाख खाती उघडण्यात आली. या कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनी ट्विट करून भारतीय पोस्ट ऑफिसचे अभिनंदन केले आहे. या लोकप्रिय योजनेत दरवर्षी सुमारे ३३ लाख खाती उघडली जातात.

विभाग