मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Share tips : रेल्वे धावली सुसाट ! आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये रेकाॅर्ड ब्रेक वाढ

Share tips : रेल्वे धावली सुसाट ! आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये रेकाॅर्ड ब्रेक वाढ

Nov 28, 2022, 12:56 PM IST

    • IRCTC shares Tips : आपल्या ५२ आठवड्याच्या निम्न २९ रुपयांच्या पातळीवरुन रेल्वे विकास निगमचे शेअर्स ८०.६० रुपयांवर पोहोचले आहेत.
Share tips HT

IRCTC shares Tips : आपल्या ५२ आठवड्याच्या निम्न २९ रुपयांच्या पातळीवरुन रेल्वे विकास निगमचे शेअर्स ८०.६० रुपयांवर पोहोचले आहेत.

    • IRCTC shares Tips : आपल्या ५२ आठवड्याच्या निम्न २९ रुपयांच्या पातळीवरुन रेल्वे विकास निगमचे शेअर्स ८०.६० रुपयांवर पोहोचले आहेत.

IRCTC shares Tips : आपल्या ५२ आठवड्याच्या निम्न २९ रुपयांच्या पातळीवरुन रेल्वे विकास निगमचे शेअर्स ८०.६० रुपयांवर पोहोचले आहेत. हा त्या शेअर्सचा गेल्या ५२ आठवड्यातील उच्चांक आहे. या स्टाॅक्सनी गेल्या महिन्याभरातच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Govt Savings schemes : दररोज फक्त २५० रुपये गुंतवा आणि २४ लाख मिळवा! ‘ही’ सरकारी योजना तुम्हाला बनवेल लखपती

China Gold Purchase : सोनं महाग होण्यामागे चीनचा हात, नेमकं काय करतोय चिनी ड्रॅगन

Amazon Summer Sale: कडक उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद; एसीच्या खरेदीवर अ‍ॅमेझॉन देतोय ५५ टक्के सूट!

NBFC FD Rates : 'या' पाच वित्तीय कंपन्या एफडीवर देतायत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर

सतत मिळत असलेल्या आॅर्डर्समुळे रेल्वे विकास निगम (आयआरसीटीसी) च्या शेअर्स अचानक बुलेट ट्रेन्सप्रमाणे धावू लागले आहेत. गेल्या ५ दिवसांमध्ये या कंपनीच्या स्टाॅक्सनी ३१ टक्क्यांपेक्षा अधिक उसळी मारली आहे. आजही तो अंदाजे ८०.६० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या महिन्याभरातच या शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे दुपट्ट झाले आहेत. या कालावधीत शेअर्सने अंदाजे ९६ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे.

गेल्या सहा महिन्यांमध्ये आयआरसीटीसीच्या शेअर्सनी १४६ टक्क्यांपेक्षा अधिक तर या वर्षात १२६ टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स दिले आहेत. गेल्या वर्षी तर या शेअर्सनी तब्बल१४० टक्के परतावा दिला होता.

आयआरसीटीसीची स्थापना केंद्र सरकारद्वारे १९ डिसेंबर २००२ ला झाली होती. कंपनी कायद्यांतर्गत २४ जानेवारी २००३ मध्ये ही कंपनी नोंदणीकृत झाली. सार्वजनिक क्षेत्रातील ही कंपनी १०० टक्के केंद्र सरकारच्या अधिकारांतर्गत आहे.

(डिस्‍क्‍लेमर: ही माहिती केवळ कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)

विभाग