मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Share tips : हे आहेत आजचे टाॅप ५ शेअर्स, देतील ४० टक्क्यांहून अधिक रिटर्न्स

Share tips : हे आहेत आजचे टाॅप ५ शेअर्स, देतील ४० टक्क्यांहून अधिक रिटर्न्स

Nov 25, 2022, 02:02 PM IST

    • सप्टेंबर तिमाही निकालांच्या आधारे शेअर्स तज्ज्ञांनी आजच्या टाॅप ५ शेअर्सची यादी दिली आहे.
invest money in Share market HT

सप्टेंबर तिमाही निकालांच्या आधारे शेअर्स तज्ज्ञांनी आजच्या टाॅप ५ शेअर्सची यादी दिली आहे.

    • सप्टेंबर तिमाही निकालांच्या आधारे शेअर्स तज्ज्ञांनी आजच्या टाॅप ५ शेअर्सची यादी दिली आहे.

Stock to buy : सप्टेंबर तिमाही निकाल आणि कंपन्यांच्या कॉर्पोरेट विकासाच्या आधारावर अनेक समभाग आकर्षक दिसत आहेत. ब्रोकरेज हाऊसेसने दीर्घकालीन दृष्टीकोनातून काही दर्जेदार समभागांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज शेअर तज्ज्ञांनी पुढील पाच शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्समध्ये पुढील काही दिवसात ४० टक्क्यांपर्यंत मजबूत परतावा मिळू शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

ल्यूमॅक्स आँटो - या स्टाॅकवर ब्रोकरेज फर्म शेअरखानने खरेदीचा सल्ला दिला आहे. प्रति शेअर्सचे टार्गेट प्राईज ३५६ रुपये आहे. २४ नोव्हेंबर २०२२ ला शेअर्सचे मूल्य अंदाजे २५४ रुपये होते. याच प्रमाणे गुंतवणूकदारांना प्रति शेअर्स १०२ रुपये म्हणजे अंदाजे ४० टक्के परतावा मिळू शकतो.

सुपराजित इंजिनिअरिंग - या स्टाॅकवर तज्ज्ञ बुलिश आहेत. प्रति शेअर्स टार्गेट प्राईस अंदाजे ३८६ रुपये आहे. २४ नोव्हेंबरला शेअर्सचे मूल्य अंदाजे ३३४ रुपये होते. याचप्रमाणे गुंतवणूकदारांना ५२ रुपयांचा म्हणजे १५ टक्के फायदा मिळू शकतो.

बालकृष्णन इंडस्ट्रीज : हा स्टाॅक आता खरेदी करण्यास योग्य आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. शेअर्सचे प्रति शेअर्स टार्गेट मूल्य अंदाजे २४७९ रुपये आहे. २४ नोव्हेंबरला बाजारात शेअऱचा भाव अंदाजे १९७५ रुपये होता. याचप्रमाणे गुंतवणूकदारांना प्रति शेअर्स ५०४ रुपये म्हणजेच २६ टक्के रिटर्न्स मिळण्याची शक्यता आहे.

ट्रान्सपोर्ट काॅर्पोरेशन : मोतिलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने ट्रान्सपोर्ट काॅर्पोरेशनचा शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्सचे प्रति शेअर्स टार्गेट प्राईज ८१० रुपये आहे. २४ नोव्हेंबरला शेअर्सचा भाव अंदाजे ६३८ रुपये होता. याप्रमाणे गुंतवणूकदारांना प्रति शेअर्स १७२ रुपये अथवा अंदाजे २७ टक्के रिटर्न्स मिळू शकतात.

आरती इंडस्ट्री : या शेअर्सचे टार्गेट प्राईस अंदाजे ८०० रुपये आहे. काल शेअर बाजारातील भाव हा अंदाजे ६५७ रुपये प्रति शेअर्स होता. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना प्रति शेअर्स १४३ रुपये किंवा २२ टक्के रिटर्न्स पुढील काही दिवसांत मिळण्याची शक्यता असल्याने तज्ज्ञांनी बाय नाऊ चा सल्ला दिला आहे. 

विभाग

पुढील बातम्या