मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ratan tata net worth : तब्बल ३० कंपन्यांचे मालक आहेत रतन टाटा; संपत्ती किती माहित्येय?

ratan tata net worth : तब्बल ३० कंपन्यांचे मालक आहेत रतन टाटा; संपत्ती किती माहित्येय?

Jan 24, 2023, 07:21 PM IST

  • ratan tata net worth :  भारतीय श्रीमंतांच्या यादीचा विचार करताना सगळ्यात आधी सहजच रतन टाटा यांचे नाव येते. अंदाजे ३० कंपन्यांचा डोलारा सांभाळणाऱ्या रतन टाटांची संपत्ती काहीशा लाख कोटींच्या घरात आहेत. पण असे असले तरी दानशूर उद्योगपतींमध्ये रतन टाटांचा नंबर पहिला आहे.

Ratan tata_HT

ratan tata net worth : भारतीय श्रीमंतांच्या यादीचा विचार करताना सगळ्यात आधी सहजच रतन टाटा यांचे नाव येते. अंदाजे ३० कंपन्यांचा डोलारा सांभाळणाऱ्या रतन टाटांची संपत्ती काहीशा लाख कोटींच्या घरात आहेत. पण असे असले तरी दानशूर उद्योगपतींमध्ये रतन टाटांचा नंबर पहिला आहे.

  • ratan tata net worth :  भारतीय श्रीमंतांच्या यादीचा विचार करताना सगळ्यात आधी सहजच रतन टाटा यांचे नाव येते. अंदाजे ३० कंपन्यांचा डोलारा सांभाळणाऱ्या रतन टाटांची संपत्ती काहीशा लाख कोटींच्या घरात आहेत. पण असे असले तरी दानशूर उद्योगपतींमध्ये रतन टाटांचा नंबर पहिला आहे.

ratan tata net worth : भारतात क्वचितच असा कोणी व्यक्ती असेल जो रतन टाटांना ओळखत नसेल. रतन टाटांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे लोकांना माहिती नाही. पण भारतीय उद्योगपतींच्या यादीत रतन टाटा यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आज देशाच्याच नाही तर जागतिक पातळीवरही टाटा समुह मोलाची भूमिका निभावत आहे. टाटा मीठापासून ते स्टीलपर्यंत प्रत्येक क्षेत्रात या समुहाने आपली ओळख निर्माण केली आहे. टाटा समुहात आज अंदाजे १०० हून अधिक कंपन्या आहेत. पण त्या उभ्या करण्यामागे मास्टरमाईंड रतन टाटा यांचे आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

Govt Savings schemes : दररोज फक्त २५० रुपये गुंतवा आणि २४ लाख मिळवा! ‘ही’ सरकारी योजना तुम्हाला बनवेल लखपती

China Gold Purchase : सोनं महाग होण्यामागे चीनचा हात, नेमकं काय करतोय चिनी ड्रॅगन

Amazon Summer Sale: कडक उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद; एसीच्या खरेदीवर अ‍ॅमेझॉन देतोय ५५ टक्के सूट!

कोण आहेत रतन टाटा?

टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा आणि रतन टाटा यांच्यात रक्ताचे नाते नाही. रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. रतन टाटा हे नवल टाटा यांचा मुलगा आहे. ज्यांना नवजाबाई टाटा यांनी दत्तक घेतले होते. कारण नवजाबाई टाटा यांच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर त्या एकाकी पडल्या म्हणून त्यांनी छोट्या रतनला त्यांना दत्तक घेतले. जेव्हा रतन टाटा फक्त १० वर्षांचे होते आणि त्यांचा धाकटा भाऊ जिमी टाटा ७ वर्षांचा होता, तेव्हा त्यांचे आई-वडील एकमेकांपासून वेगळे झाले होते. ज्यामुळे दोन्ही भावांनाही वेगळे व्हावे लागले होते. रतन टाटा यांची आजी नवजाबाई यांनी त्यांच्या दोन नातवंडांना वाढवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्या शिस्तीच्या बाबतीत जितक्या मवाळ होत्या तितक्याच कठोर होत्या. रतन टाटा यांना नोएल टाटा नावाचा सावत्र भाऊ देखील आहे.

रतन टाटांचे शिक्षण

रतन टाटा यांनी त्यांचे सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील चॅम्पियन स्कूलमधून केले. जिथे त्यांनी ८ वी पर्यंत शिक्षण घेतले. यानंतर ते कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये गेले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून १९६२ मध्ये बीएस आर्किटेक्चरमध्ये स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग पूर्ण केले. यानंतर त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी १९७५ मध्ये अँडव्हान्स व्यवस्थापन विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

टाटा समूह

रतन टाटा यांनी जेआरडी टाटा यांच्यानंतर १९९१ मध्ये टाटा समुहाची धुरा सांभाळली. आज देशविदेशात प्रत्येक क्षेत्रात टाटा समुहाच्या शाखा विस्तारलेल्या आहेत. टाटा समुहात प्रामुख्याने ३० कंपन्यांचा समावेश असून १०० पेक्षा अधिक देशांमध्ये कंपनीचा विस्तार आहे. टाटा समुहातील महत्त्वाच्या कंपन्यांच्या यादीत टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टेंसी सर्विसेज, टाटा पावर, टाटा ग्लोबल बेवरेजेज, टाटा केमिकल्स, इंडियन होटल्स और टाटा टेलीसर्विसेज यांचा समावेश आहे.

रतन टाटा यांची संपत्ती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रतन टाटा यांची एकूण संपत्ती ११७ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे ८.२५ लाख कोटी रुपये आहे. रतन टाटा यातील ६५ टक्के रक्कम लोकांच्या मदतीसाठी देतात. याच कारणामुळे त्याचा जगातील श्रीमंतांच्या यादीत समावेश नाही. पण लोक त्यांना मनाने खूप श्रीमंत मानतात. रतन टाटा यांची एका दिवसाची कमाई अंदाजे तीन कोटींपेक्षा अधिक आहे.

रतन टाटानेटवर्थ
नेटवर्थ डाॅलर्समध्ये १ अब्ज डाॅलर्स
नेटवर्थ रुपयांमध्ये७४१६ कोटी रुपये
मासिक उत्पन्न९० कोटींपेक्षा अधिक 
वार्षिक उत्पन्न८२० कोटींपेक्षा अधिक
वाढदिवस२८ डिसेंबर १९३७
वैवाहिक जीवनसिंगल 
उंची १.७७ मीटर (५'१० ‘’ )
प्रोफेशनव्यावसायिक 
राष्ट्रीयत्वभारतीय

विभाग