मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IDBI Bank : आयडीबीआयच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरळीत; सरकारच्या खुलाशानंतर शेअर्स उसळले

IDBI Bank : आयडीबीआयच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरळीत; सरकारच्या खुलाशानंतर शेअर्स उसळले

Mar 19, 2023, 12:33 PM IST

  • IDBI Bank : गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागा (DIPAM) चे सचिव तुहीन कांता पांडे यांनी ट्विट केले एक्सप्रेशन आॅफ इंटरेस्ट (ईओआय) मिळाल्यानंतर पुढील टप्प्यातील प्रक्रिया जारी करण्यात येणार आहे. सरकार आणि एलआयसी मिळून आयडीबीआय बँकेत अंदाजे ६१ टक्के हिस्सेदारी आहे.

idbi-bank HT

IDBI Bank : गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागा (DIPAM) चे सचिव तुहीन कांता पांडे यांनी ट्विट केले एक्सप्रेशन आॅफ इंटरेस्ट (ईओआय) मिळाल्यानंतर पुढील टप्प्यातील प्रक्रिया जारी करण्यात येणार आहे. सरकार आणि एलआयसी मिळून आयडीबीआय बँकेत अंदाजे ६१ टक्के हिस्सेदारी आहे.

  • IDBI Bank : गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागा (DIPAM) चे सचिव तुहीन कांता पांडे यांनी ट्विट केले एक्सप्रेशन आॅफ इंटरेस्ट (ईओआय) मिळाल्यानंतर पुढील टप्प्यातील प्रक्रिया जारी करण्यात येणार आहे. सरकार आणि एलआयसी मिळून आयडीबीआय बँकेत अंदाजे ६१ टक्के हिस्सेदारी आहे.

IDBI Bank : सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेच्या विक्री प्रक्रियेतील दिरंगाईच्या प्रतिक्षेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. वास्तविक, सरकारने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. रणनितीक विक्री प्रक्रियेंर्गत आयडीबीआय बँकेतील निर्गुंतवणूक योग्य मार्गावर आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने बँकेची निर्गुंतवणूक टाळण्याच्या शक्यतेचा अहवालावर प्रतिक्रिया देताना ही माहिती दिली.

ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

डीआयपीएएमचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी ट्विट करत माहिती दिली की, एक्सप्रेशन आँफ इंटरेस्ट मिळाल्यानंतर पुढील टप्प्याची प्रक्रिया जाहीर करण्यात येणार आहे. सरकार आणि एलआयसी मिळून आयडीबीआयमध्ये अंदाजे ६१ टक्के हिस्सा विक्री करणार आहे. जानेवारीत यासाठी अनेक ईओआय प्राप्त झाले आहेत.

९४.७२ टक्के हिस्सेदारी

गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये डीआयपीएएमने बँकेतील एलआयसीच्या ३० टक्के हिस्सेदारी सहित आयडीबीआय बँकेत ३०.४८ टक्के हिस्सा विक्री करण्यासाठी ईओआय आमंत्रित केले होते. सरकार आणि एलआयसीची संयुक्तपणे आयडीबीआयमध्ये ९४.७२ टक्के हिस्सेदारी आहे. या निर्गुंतवणूकीनंतर ती अंदाजे ३४ टक्के राहिल.

सध्याच्या काळात सरकार, रिझर्व्ह बँक मिळालेल्या बोलींचे पूर्नपरिक्षण करण्याच्या प्रक्रियेत आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी ईओआय सादर केले आहेत, त्यांनी अत्यावश्यक कागदपत्रे याआधीच सादर केले आहेत. एप्रिल २०२३ पासून सुरु हणाऱ्या नव्या वित्तीय वर्षातील दुसऱ्या सहामाहीपर्यंत व्यवहार प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानुसार, आयडीबीआय बँकेत सरकारची १५ टक्के आणि एलआयसीची १९ टक्के हिस्सेदारी असेल. यानंतर सरकार आणि एलआयसीची एकूण हिस्सेदारी ३४ टक्के होईल.

शेअर्समध्ये उसळी

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी बँकेच्या शेअर्सचे भाव ४५ रुपयांपेक्षा अधिक होते. एक दिवस आधीच्या तुलनेत शेअर्समध्ये ३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. आयडीबीआयचे बाजारभांडवल ४९ हजार कोटींपेक्षा अधिक आहे.

विभाग