मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Recruitment news : पदवीधरांना सुवर्णसंधी! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ३ हजार प्रशिक्षणार्थी पदांची भरती

Recruitment news : पदवीधरांना सुवर्णसंधी! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ३ हजार प्रशिक्षणार्थी पदांची भरती

Feb 22, 2024, 04:40 PM IST

  • Central Bank of India Apprentice Recruitment : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ३ हजार प्रशिक्षणार्थी पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

Central Bank Of India Apprentice Recruitment

Central Bank of India Apprentice Recruitment : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ३ हजार प्रशिक्षणार्थी पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

  • Central Bank of India Apprentice Recruitment : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ३ हजार प्रशिक्षणार्थी पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

Central Bank of India Apprentice Recruitment : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियानं ३००० शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून www.nats.education.gov.in या अप्रेंटिसशिप पोर्टलवर अर्ज भरता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च आहे. एक वर्षाच्या कालावधीसाठी ही भरती असेल. मात्र निवड झालेल्या उमेदवारांसाठी बँकिंग क्षेत्रातील नोकरीची दारं खुली होणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

Govt Savings schemes : दररोज फक्त २५० रुपये गुंतवा आणि २४ लाख मिळवा! ‘ही’ सरकारी योजना तुम्हाला बनवेल लखपती

China Gold Purchase : सोनं महाग होण्यामागे चीनचा हात, नेमकं काय करतोय चिनी ड्रॅगन

पात्रता - उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. त्यानं ३१ मार्च २०२० नंतर पदवी पूर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा - उमेदवाराचा जन्म १ एप्रिल १९९६ ते ३१ मार्च २००४ दरम्यान झालेला असावा.

निवड - लेखी परीक्षेद्वारे होईल.

अर्ज शुल्क - दिव्यांग ४०० रुपये अधिक जीएसटी.

एससी, एसटी आणि सर्व महिला उमेदवार - ६०० रुपये अधिक जीएसटी. इतरांसाठी ८०० रुपये.

‘या’ आहेत अटी

उमेदवार केवळ एका राज्यातच अर्ज करू शकतात. मात्र, नोकरीची संधी बँकेच्या गरजेनुसार आणि रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार मिळेल. 

उमेदवारांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया किंवा इतर कोणत्याही संस्थेमध्ये यापूर्वी शिकाऊ प्रशिक्षण घेतलेले नसावे. 

नोकरीचा एक किंवा अधिक वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार हे प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्तीसाठी पात्र असणार नाहीत.

अशी होईल अंतिम निवड

निवड झालेल्या उमेदवारांना ऑनलाइन लेखी परीक्षा द्यावी लागेल. लेखी परीक्षेत परिमाणात्मक योग्यता, सामान्य इंग्रजी, तर्क क्षमता, संगणक ज्ञान, मूलभूत गुंतवणूक उत्पादने आणि मूलभूत विमा उत्पादने समाविष्ट असलेल्या विभागांचा समावेश असेल. निवड गुणवत्तेवर आधारित असेल आणि स्थानिक भाषेतही प्राविण्य आवश्यक आहे.

कोणत्या राज्यात किती पदे?

लडाख - २

गुजरात - २७०

दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव - ३

मध्य प्रदेश - ३००

छत्तीसगड - ७६

चंदीगड - ११

हरियाणा - ९५

पंजाब - ११५

जम्मू आणि काश्मीर - ८

हिमाचल प्रदेश - २६

तामिळनाडू - १४२

पुडुचेरी - ३

केरळ - ८७

राजस्थान - १०५

दिल्ली - ९०

आसाम - ७०

मणिपूर - ८

नागालँड - ८

आंध्र प्रदेश - १००

मिझोराम - ३

मेघालय - ५

त्रिपुरा - ७

कर्नाटक - ११०

तेलंगणा - ९६

अरुणाचल प्रदेश - १०

ओडिशा - ८०

पश्चिम बंगाल - १९४

अंदमान आणि निकोबार - १

सिक्कीम - २०

उत्तर प्रदेश - ३०५

गोवा - ३०

महाराष्ट्र - ३२०

बिहार - २१०

झारखंड - ६०

उत्तराखंड - ३०