मराठी बातम्या  /  बिझनेस  /  RBI E Rupee : आरबीआयच्या ई-रुपीचा बोलबाला; भाजीच्या गाड्यांवरही झळकले स्कॅनर

RBI E Rupee : आरबीआयच्या ई-रुपीचा बोलबाला; भाजीच्या गाड्यांवरही झळकले स्कॅनर

Jan 25, 2023, 07:33 PM IST

  • Anand Mahindra tweet on E Rupee : रिझर्व्ह बँकेच्या बैठकीसाठी गेलेले उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ई रुपीबद्दल जाणून घेतले. या बैठकीनंतर त्यांनी ई रुपी वापराचा व्हिडिओ ट्विटर व्हायरल केला आहे.

E Rupee

Anand Mahindra tweet on E Rupee : रिझर्व्ह बँकेच्या बैठकीसाठी गेलेले उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ई रुपीबद्दल जाणून घेतले. या बैठकीनंतर त्यांनी ई रुपी वापराचा व्हिडिओ ट्विटर व्हायरल केला आहे.

  • Anand Mahindra tweet on E Rupee : रिझर्व्ह बँकेच्या बैठकीसाठी गेलेले उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ई रुपीबद्दल जाणून घेतले. या बैठकीनंतर त्यांनी ई रुपी वापराचा व्हिडिओ ट्विटर व्हायरल केला आहे.

Anand Mahindra tweet : आनंद महिंद्रा हे बुधवारी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) संचालक मंडळाच्या बैठकीसाठी गेले होते. तिथे त्यांना भारतातील डिजिटल चलन ई-रुपीबद्दल माहिती मिळाली आणि लगेचच त्याचा वापरही त्यांनी केला. त्यांनी एका विक्रेत्याकडून फळ खरेदी करण्यासाठी ते वापरले.

ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

यासंदर्भात त्यांनी एक मजेशीर व्हिडिओ ट्विटरवर शेअऱ केला आहे. त्यात ते म्हणतात, "आज रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मला आरबीआय डिजिटल चलन-ई-रुपी बद्दल कळले. मीटिंगनंतर लगेच, मी जवळच असलेले फळ विक्रेते बच्चे लाल सहानी यांच्या फ्रुट स्टाॅलला भेट दिली. ते स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्यांपैकी त्यांचा नंबर पहिला असावा. डिजिटल इंडिया कृतीत ही बाब आहे! मला उत्तम डाळिंबही मिळाले.

व्हिडिओमध्ये, आनंद महिंद्रा कॅमेऱ्यासमोर दिसत नाहीत. मात्र पेमेंट करण्यापूर्वी त्यांनी फळ विक्रेत्याकडून ई-रुपी क्यूआर कोड स्कॅन केला आणि नंतर पूर्ण झालेला व्यवहार दाखवला आहे.. ही प्रक्रिया क्यूआर कोड स्कॅन करून यूपीआय पेमेंट करण्यासारखीच होती.