Chhagan Bhujbal on Lok Sabha Election : महायुतीमध्ये वादाचा मुद्दा ठरलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी माघार घेतली आहे. त्यामुळं आता ही जागा शिंदेंची शिवसेना लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. इथं नेमका कोण उमेदवार असेल याविषयी आता उत्सुकता आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याबरोबरच अजय बोरस्ते हे देखील इथून इच्छुक आहेत. एकनाथ शिंदे कोणाच्या पारड्यात वजन टाकतात, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.