Jayant Patil Speech in Sangli : सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज खासदार संजय राऊत व जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज दाखल करण्यात आला. त्यावेळी जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना जयंत पाटील यांनी सांगलीतील उमेदवारीच्या निमित्तानं त्यांच्यावर होत असलेले आरोप खोडून काढले. सांगलीच्या उमेदवारीशी माझा काहीही संबंध नाही. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं मागितलीच नव्हती. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा हा निर्णय आहे. उद्धव ठाकरे यांनी एकदा निर्णय घेतला की ते कोणाचंही ऐकत नाही. एकदा निर्णय झाला की भाजपला पराभूत करण्याचं आपलं लक्ष्य असलं पाहिजे. एका कुणाच्या महत्त्वाकांक्षेपायी आपण ध्येयापासून विचलित होता कामा नये. त्यामुळं सर्वांनी ठामपणानं काम करावं. एकास एक लढत झाली तर आपला विजय नक्की आहे, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.