Uddhav Thackeray Sangli Rally : सांगली जिल्ह्यातील मिरज इथं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. याच सभेत उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. यावेळी जनसमुदायाला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या अपप्रचाराचा समाचार घेतला. 'सिंदखेडराजा येथील सभेत आम्ही औरंगजेबी वृत्ती म्हणालो. तर मोदी लोकांना सांगत सुटले की मला औरंगजेब म्हणतायत आणि माझा शिरच्छेद करण्याच्या धमक्या देतायत. पण आम्ही इतक्या खालच्या थराचे नाही. महाराष्ट्र लुटणाऱ्या प्रवृत्तीबद्दल बोललो. आज पुन्हा बोलतो. महाराष्ट्र लुटणाऱ्या प्रवृत्तीला मूठमाती दिल्याशिवाय आम्ही राहणारन नाही, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.