Sharad Pawar Speech Video : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. उंडवडी कडेपठार इथं झालेल्या या सभेत शरद पवारांनी मोठ्या आत्मीयतेनं ग्रामस्थांशी संवाद साधला. राष्ट्रवादीच्या पक्षाचं नवं चिन्ह तुतारी हे राज्यात पोहोचलंय, असं शरद पवार म्हणाले. हे सांगताना त्यांनी मुंबई-पुणे प्रवासात असताना लोणावळ्याजवळ घडलेला एक किस्सा उपस्थितांना ऐकवला. माझ्याकडं बघून शाळेतली मुलंही तुतारी वाजवू लागली. तेव्हा मला कळलं तुतारी पोहोचलीय, असं पवार म्हणाले. त्यावर एकच हंशा पिकला.