मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Raj Thackeray : 'बाळासाहेबांमुळंच मी नवा पक्ष काढू शकलो'

Raj Thackeray : 'बाळासाहेबांमुळंच मी नवा पक्ष काढू शकलो'

24 January 2023, 18:34 IST Ganesh Pandurang Kadam
24 January 2023, 18:34 IST

Raj Thackeray speech on Balasaheb Thackeray : विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण त्यांच्या जयंतीदिनी २३ जानेवारी २०२३ रोजी झालं. त्यावेळी बाळासाहेबांच्या सहवासात राहिलेले शिवसेनेचे अनेक आजी-माजी नेते उपस्थित होते. त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणी सांगितल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही बाळासाहेबांच्या आठवणी सांगितल्या. 'माझ्याकडं कडेवरच्या, बोट धरून चालण्याच्या, व्यंगचित्र शिकवणीच्या, राजकारणाच्या अशा अनेक आठवणी आहेत. बाळासाहेबांचे संस्कार मी वेचत गेलो. ते बाहेर वेगळे आणि आतमध्ये वेगळे असे कधीच नव्हते. मी बाळासाहेबांचा विचारांचा वारसा जपलाय, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. वेगळा पक्ष मी काढू शकलो ही बाळासाहेबांच्याच विचारांची ताकद आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

Readmore