Urfi Javed Mattress Skirt: आपल्या विचित्र फॅशन आणि ड्रेसिंग सेन्समुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणारी उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमधील उर्फीचा ड्रेस पाहून तुम्हीही थक्क व्हाल. उर्फी जावेदचा हा मॅट्रेस स्कर्ट चांगलाच व्हायरल होत आहे. उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. उर्फी जावेद अनेक टीव्ही शो, रिॲलिटी शो आणि म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली आहे.