शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मुख्यमंत्र्यांचे पुत्र, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर शहरातील संपर्क कार्यालयाची जागा कुणाच्या मालकीची आहे, याचा तपास व्हावा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. संपर्क कार्यालयाच्या जागेचा आणि बुकी अनिल जयसिंघानीचा काही संबंध आहे का, याचा तपास करण्याची मागणी अंधारे यांनी केली आहे.