Priyanka Chopra At Ayodhya: बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा लॉस एंजेलिसमध्ये शिफ्ट झाल्यापासून तो मुंबईला क्वचितच भेट देते. पण, अभिनेत्री तिच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून मायदेशी आवर्जून येते. प्रियांका चोप्रा नुकतीच एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारतात आली आहे. तिच्यासोबत तिचा पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी देखील भारतात आले आहेत. दरम्यान, 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा वेळ काढून प्रभू रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी रामजन्मभूमी अयोध्येला पोहोचली होती.