MS Dhoni New Look: आयपीएल २०२४चा पहिला सामना २२ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी लांब केसांच्या लूकमध्ये दिसला आहे. त्याचा हा विंटेज लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. आता आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनीचे या लूकमधील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.