Mrunayee Deshpande: मराठमोळी अभिनेत्री देशपांडे नेहमीच काहीतरी हटके करताना दिसते. शहरातल्या धकाधकीच्या आयुष्यातून ब्रेक घेऊन मृण्मयी शेतात रंमताना देखील दिसते. मृण्मयी आणि तिचा नवरा स्वप्निल यांनी महाबळेश्वरमध्ये खास जागा घेऊन, तिथं शेती करण्याचा निर्णय घेतला होता. दोघे स्वतः शेती करताना दिसतात. आता त्यांनी याच शेतात माती आणि शेणाने लिंपलेलं एक सुंदर घर बांधलं आहे. आपल्या या घराची झलक त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.