Uddhav Thackeray on Prakash Ambedkar Video : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिकेवर पहिल्यांदाच भाष्य केलं. घटनेनं दिलेल्या लोकशाहीनुसार प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा आणि भूमिका घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी तशी भूमिका घेतली आहे. मात्र आज आमचं जमलं नाही म्हणून भविष्यातही जमणार नाही असं नाही. त्यामुळं प्रकाश आंबेडकरांनी आमच्यावर काहीही टीका केली तरी आम्ही त्यांच्यावर टीका करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.