मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: मानसिक आरोग्य आणि होमिओपॅथीवर भाष्य करणारं ‘फील गुड हील गुड’; डॉ. मुकेश बत्रा यांचं नवं पुस्तक

Video: मानसिक आरोग्य आणि होमिओपॅथीवर भाष्य करणारं ‘फील गुड हील गुड’; डॉ. मुकेश बत्रा यांचं नवं पुस्तक

Apr 23, 2024 06:18 PM IST Harshada Bhirvandekar
Apr 23, 2024 06:18 PM IST

Dr Mukesh Batra New Book: होमिओपॅथीच्या विश्वात डॉ. मुकेश बत्रा हे फार मोठे नावे आहे. त्यांनी आजवर अनेक दिग्गज सेलिब्रिटी, राजकारणी यांपासून ते परदेशातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांवर उपचार केले आहेत. त्यांच्या होमिओपॅथीवर अनेकांचा दृढ विश्वास आहे. होमिओपॅथी केवळ भारतातच नाही, तर परदेशात देखील आता अतिशय उपयुक्त औषध पद्धती असल्याचे मानले जात आहे. यामध्ये डॉ. मुकेश बत्रा यांचे महत्त्वाचे योगदान आहे. नुकतेच डॉ. मुकेश बत्रा यांचे दहावे पुस्तक ‘फील गुड हिल गुड स्टेयिंग हॅपी विथ होमिओपॅथी’ प्रकाशित झाले आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’शी संवाद साधला. या खास संवादात त्यांनी आपल्या पुस्तकाबद्दल तर सांगितलं, मात्र मानसिक आरोग्य आणि होमिओपॅथी विषयी बऱ्याच गोष्टी शेअर केल्या.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp