बिग बॉसचा १६वा सीझन खूप चर्चेत होता. शो संपल्यानंतरही शोचे स्पर्धक सतत चर्चेत आहेत. दरम्यान, शोचा आवडता स्पर्धक आणि फर्स्ट रनर अप शिव ठाकरे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. त्यांच्या घरी नवीन पाहुणे आले आहे. होय, शिवने एक नवीन आणि आलिशान कार घेतली आहे. ही गाडी घेऊन तो मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनाला गेला. याचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.