बॉलिवूडमधील कॉमेडी आणि गंभीर भूमिका करणारा अभिनेता म्हणून अर्शद वारसी हा ओळखला जातो. अर्शदने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याला खरी ओळख 'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटातून मिळाली होती. या चित्रपटातील अर्शदचे अभिनेता संजय दत्त सोबतची 'सर्किट' ही भूमिका प्रेक्षकांना फार आवडली होती. त्यानंतर त्याचा 'जॉली एलएलबी' हा चित्रपट गाजला. त्याच्या प्रत्येक भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज अर्शदचा वाढदिवस आहे. त्याने मध्यरात्री फोटोग्राफर्ससोबत तो साजरा केला आहे.