Navneet Rana video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा आहे म्हणून मी निवडून येईन अशा फुग्यात कोणत्याही कार्यकर्त्यानं राहू नये. २०१९ साली सर्व यंत्रणा विरोधात असतानाही मी अपक्ष निवडून आले होते, असं वक्तव्य अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केलं होतं. त्यावरून विरोधकांनी भाजपला लक्ष्य केल्यानंतर नवनीत राणा यांनी तात्काळ यावर खुलासा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरच आम्ही मतं मागत आहोत. मोदींची हवा होती, आहे आणि राहील, असं त्या म्हणाल्या. माझं वक्तव्या तोडूनमोडून मीडियामध्ये दाखवलं जात आहे. विरोधक विनाकारण त्याचं भांडवल करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.