Latest indian navy Photos

चाचेगिरीचा आणखी एक हल्ला हाणून पाडून भारतीय नौदलाने समुद्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. भारतीय नौदलाने शुक्रवारी अरबी समुद्रात अपहृत इराणी मासेमारी जहाज अल-कंबर ७८६ आणि त्याच्या २३  सदस्यीय पाकिस्तानी क्रूची सुरक्षितपणे सुटका केली. १२  तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या या मोहिमेत भारतीय नौदलाच्या कमांडोंनी चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नौदलाने समुद्री चाच्यांविरूद्ध १२  तासांहून अधिक काळ चाललेल्या ऑपरेशननंतर ओलिस ठेवलेल्या  इराणी मासेमारी जहाज आणि २३  पाकिस्तानी नागरिकांची सुटका केली.

हिंद महासागरात भारतीय नौदलाचा दबदबा! तब्बल १२ तासांच्या मोहिमेनंतर समुद्री चाचांपासून २३ पाकिस्तानींची सुटका

Saturday, March 30, 2024

भारतीय नौदलाने जारी केलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की बार्बाडोस-ध्वजांकित बल्क कॅरिअर एमव्ही ट्रू कॉन्फिडन्स जहाजावर  एडनच्या आखाताच्या दक्षिण-पश्चिम ५५  नॉटिकल मैल अंतरावर ड्रोन/क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला होता.

INS Kolkata : भारतीय नौदलाची धडाडक कारवाई! गल्फ ऑफ एडन मध्ये समुद्री चाचांपासून लाइबेरियन जहाजाची सुरक्षा

Thursday, March 7, 2024

आयएनएस इंफाळ ही प्रोजेक्ट 15B स्टेल्थ गाईडेड मिसाईलद्वारे सज्ज युद्धनौका आज, २६ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय नौदलात दाखल करण्यात आली. नौदलात दाखल चार स्वदेशी 'विशाखापट्टणम' श्रेणीतील  विनाशिकांपैकी तिसरी विनाशिका भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाइन ब्युरोने डिझाइन केली असून माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल), मुंबई यांनी ती तयार केली आहे. यावेळी मुंबईतील नौदल गोदीत समारंभ आयोजित करण्यात आला होता. समारंभात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

INS Imphal : शत्रू सैन्यात धडकी भरवणारी क्षेपणास्त्राने सज्ज युद्धनौका 'इम्फाळ' नौसेनेच्या ताफ्यात

Tuesday, December 26, 2023

इस्रायलचे व्यापारी जहाज सौदी अरेबियातून क्रूड ऑईल घेऊन मंगळुरूकडे येत असताना गुजरातनजीकच्या अरबी समुद्रात जहाजावर ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यात जहाजावर आग लागली आहे. या जहाच्या मदतीसाठी भारताने एक युद्धनौका पाठवली आहे. इंडियन कोस्ट गार्डच्या सहाय्यानं अखेर जहाज मुंबईच्या किनाऱ्यावर आणण्यात आले आहे. या जहाजावर इराणने ड्रोन हल्ला केल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. मात्र, हा हल्ला केल्याचा इराणने नकार दिला आहे.

Drone attack : अरबी समुद्रात जहाजावर ड्रोन हल्ला; भारतीय तटरक्षक दलाने केले एमव्ही केम प्लुटोला एस्कॉर्ट, पाहा फोटो

Tuesday, December 26, 2023

'डे अॅट सी' या उपक्रमात जहाजांद्वारे हाय-स्पीड मॅन्युव्हर्स, नौदल हेलिकॉप्टरद्वारे शोध आणि बचाव प्रात्यक्षिके आदि बाबी दाखवण्यात आल्या.

Indian Navy:भारतीय समुद्री सीमांचे रक्षण करण्यास नौदल सज्ज; ‘डे अॅट सी’त घडले सामर्थ्यांचे दर्शन

Wednesday, November 8, 2023

तीन वर्षांचे यशस्वीपणे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण... देशसेवेसाठी सज्ज असणारे तरुण... भविष्यातील आव्हानाला सामोरे जाण्याचा त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास... अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १४४ व्या तुकडीचा शिस्तबद्ध दीक्षांत सोहळा मंगळवारी खेत्रपाल परेड ग्राऊंडवर दिमाखात पार पडला.  चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ जनरल अनिल चव्हाण  यांनी विद्यार्थ्यांची मानवंदना स्विकारत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

NDA 144th Passing out parade : देश रक्षणासाठी आम्ही सज्ज; एनडीएत दिमाखदार दीक्षांत संचलन सोहळा, पाहा फोटो

Tuesday, May 30, 2023

भारतात परतण्यासाठी सुदानच्या बंदरावर भारतीयांनी मोठ्या संख्येनं जहाजावर गर्दी केली आहे.

Operation Kaveri : सुदानमध्ये अडकलेल्या २७८ भारतीयांची सुटका, मोदी सरकारच्या ऑपरेशन कावेरीला मोठं यश

Wednesday, April 26, 2023

LCA तेजसला हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडच्या एअरक्राफ्ट रिसर्च अँड डिझाइन सेंटरच्या मदतीने  एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीने डिझाइन केले आहे.

एलसीए ग्लास कॉकपिट, झिरो-झिरो इजेक्शन सीट  सारख्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे. भारतीय नौदलाने आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत मोठे यश मिळवत आयएनएस विक्रांतवर एलसीए तेजसची लँडिंग केली आहे.

Indian Navy ने रचला इतिहास.. स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतवर LCA चे यशस्वी लँडिंग, पाहा PHOTOS

Monday, February 6, 2023

भारतीय नौदलाने केलेली अतुलनीय कामगिरी आणि १९१७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान 'ऑपरेशन ट्रायडेंट' दरम्यान, पाकिस्तानच्या बंदरांवर हल्ला करत त्यांचे या युद्धात कंबरडे मोडल्याने भारताचा युद्धातील विजय सोपा झाला होता. भारतीय नौदलाच्या या कामगिरीचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. रविवारी भारतीय सशस्त्र दलाच्या उच्चपदस्थांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर आदरांजली वाहिली.

Navy Day : नौदल दिनानिमित्त भारतीय सशस्त्र दलाच्या प्रमुखांनी दिली वाहिली शहिदांना राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे आदरांजली

Monday, December 5, 2022

आयएनएस विक्रांतच्या बांधणीसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. आयएनएस विक्रांतमुळे भारताच्या सागरी सुरक्षेत वाढ होईल.

INS Vikrant: दोन फुटबॉल मैदानाएवढा आकार, एक हॉस्पिटल; नौदलाची ताकद वाढवणाऱ्या युद्धनौकेची वैशिष्ट्ये

Friday, September 2, 2022

आझादीचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी विविध उत्सवांमध्ये भाग घेण्यासाठी केनियाच्या मोम्बासा बंदरात INS तबरचे (Tabar) आगमन झाले.

Independence Day 2022 : भारतीय नौदलाने जगभरात फडकवला तिरंगा, पाहा फोटो

Monday, August 15, 2022

आयएनएस विक्रांत’ स्वबळावर देशात बांधण्यात आलेली देशातील पहिली विमानवाहू युद्धनौका आहे. २००३ ला विक्रांतच्या बांधणीला मान्यता देण्यात आली, आराखडा अंतिम होत फेब्रुवारी २००९ ला ‘कोची शिपयार्ड लिमिटेड’मध्ये बांधणीला सुरुवात झाली.

INS Vikrant: भारतीय नौदलाची ताकद वाढली; अखेर ‘आयएनएस विक्रांत’ ताफ्यात

Friday, July 29, 2022

अग्निवीरांनना वैद्यकीय आणि शारिरीक तंदुरुस्तीसाठी आधीप्रमाणेच निकष असतील. १० वी आणि १२ वी पास तरुणांना अग्निवीर म्हणून वेगवेगळ्या पदांसाठी भरती होण्याची संधी दिली जाईल. पहिल्या वर्षी अग्निवीरांना वर्षाला ४.७६ लाख रुपयांचे पॅकेज असेल. चौथ्या वर्षाच्या अखेरीस हे वेतन वार्षिक ६.९२ लाख रुपयांपर्यंत मिळेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

भारतीय लष्कराची Agnipath योजना आहे काय? जाणून घ्या वेतन, सेवाकाळ आणि सर्व काही

Tuesday, June 14, 2022

हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी परेडचा आढावा घेतला. परेडमध्ये एकूण ९०७ कॅडेट्स सहभागी झाले होते. त्यापैकी ३१७ कॅडेट्स पासिंग आउट कोर्सचे होते. यात २१२ आर्मी कॅडेट्स, ३६ नॅव्हल कॅडेट्स आणि ६९ हवाई दलाच्या कॅडेट्सचा समावेश होता, ज्यात मैत्रीपूर्ण परकीय देशांच्या (भूतान, ताजिकिस्तान, मालदीव, व्हिएतनाम, अफगाणिस्तान, श्रीलंका, म्यानमार आणि सुदान) १९ कॅडेट्सचा समावेश होता.

कदम कदम बढाये जा! एनडीएच्या विद्यार्थ्यांचे दिमाखदार दीक्षांत संचलन

Monday, May 30, 2022

सुरक्षामंत्र्यांनी विविध प्रकारच्या आॅपरेशनल कवायती या भेटी दरम्यान अनुभवल्या.  खांदेरीचे  प्रगत सेन्सर, तीची लढण्याची क्षमता, शस्त्रास्त्र डागण्याची क्षमता राजनाथ सिंह यांनी अनुभवली. यावेळी नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरी. कुमार आणि भारतीय नौदल आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

शत्रुच्या नौदलाची नाही खेर! भारतीय पाणबुडीची संरक्षण मंत्र्यांनीच घेतली टेस्ट

Friday, May 27, 2022