मराठी बातम्या  /  Sports  /  Wtc Final 2023 Former Australian Player Tom Moody Pics His Indian Playing Xi Ind Vs Aus

WTC Final साठी महान खेळाडूनं निवडली भारताची प्लेइंग इलेव्हन, या दिग्गज ऑलराऊंडरला वगळलं, पाहा

indian playing 11 for wtc final
indian playing 11 for wtc final
Rohit Bibhishan Jetnavare • HT Marathi
Jun 03, 2023 10:34 AM IST

indian playing 11 for wtc final 2023 : WTC Final पूर्वी अनेक क्रिकेट तज्ञ आपली मते मांडत आहेत. आत्तापर्यंत अनेक दिग्गजांनी या सामन्यासाठी त्यांची भारतीय प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. आता माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज टॉम मूडी यांनीदेखील भारतीय प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे.

wtc final 2023 tom moody indian playing 11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून रंगणार आहे. हा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. WTC Final जिंकून भारतीय संघ पहिल्यांदाच टेस्ट चॅम्पियनशीप जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत. मात्र, तसे पाहता इंग्लिश कंडिशन्समध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणे टीम इंडियासाठी सोपे असणार नाही.

ट्रेंडिंग न्यूज

मात्र, WTC Final पूर्वी, अनेक क्रिकेट तज्ञ आणि माजी क्रिकेटपटू वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली मते मांडत आहेत. आत्तापर्यंत अनेक दिग्गजांनी या सामन्यासाठी त्यांची भारतीय प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. आता माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज टॉम मूडी यांनीदेखील भारतीय प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याने फिरकीपटूंऐवजी वेगवान गोलंदाजांना प्राधान्य दिले आहे.

टॉप ऑर्डरमध्ये कोण-कोण?

एका स्पोर्टस चॅनलवर बोलताना टॉम मूडी यांनी आपला संघ निवडला. त्यांनी रोहित शर्मा आणि शुभमन गिलसह भारतीय प्लेइंग इलेव्हनची सुरुवात केली. यानंतर मुडी यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चेतेश्वर पुजाराला तिसऱ्या क्रमांकावर खेळेल.

टॉम मूडी यांनी विराट कोहलीलीला चौथा क्रमांक दिला. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर आयपीएल २०२३ मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसणाऱ्या अजिंक्य रहाणेला स्थान दिले आहे. त्याचवेळी केएस भरतची यष्टिरक्षक म्हणून निवड केली. इशान किशनच्या जागी टॉम मूडीने केएस भरतला संधी दिली.

फक्त एका फिरकीपटूला स्थान

टॉम मूडी यांनी आपल्या संघात एकच फिरकी गोलंदाज निवडला. त्यांनी रवींद्र जडेजाला स्थान दिले आहे. जडेजा महान अष्टपैलू खेळाडू आहे. अशा परिस्थितीत तो संघासाठी खूप प्रभावी ठरू शकतो. जडेजा खालच्या क्रमांकावर फंलदाजीची धुरा सांभाळू शकतो.

चार वेगवान गोलंदाजांची निवड

टॉम मूडी यांनी आपल्या संघात ४ वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. यामध्ये मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजसह उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांची निवड केली. शार्दुल फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही संघाला योगदान देऊ शकतो. विशेष म्हणजे मुडी यांनी आपल्या संघात अश्विनला संधी दिली नाही.

टॉम मूडी यांची भारतीय प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.

WhatsApp channel