मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WPL 2023 Opening Ceremony : महिला प्रीमियर लीगची धमाकेदार सुरुवात, कियारा-कृतीनंतर एपी ढिल्लनचा जलवा

WPL 2023 Opening Ceremony : महिला प्रीमियर लीगची धमाकेदार सुरुवात, कियारा-कृतीनंतर एपी ढिल्लनचा जलवा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 04, 2023 04:39 PM IST

WPL 2023 Opening Ceremony : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सीझनला आजपासून (४ मार्च) सुरुवात झाली आहे. मुंबईतील डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न या दोन स्टेडियममध्ये सर्व सामने खेळवले जातील. त्यापूर्वी डी.वाय.पाटील स्टेडियमवर रंगारंग उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी अभिनेत्री क्रिती सेनन, कियारा अडवाणी आणि पॉप सिंगर एपी धिल्लन यांनी परफॉर्म केले.

WPL 2023 Opening Ceremony
WPL 2023 Opening Ceremony

WPL 2023 Opening Ceremony 2023 Updates : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सीझनला आजपासून (४ मार्च) सुरुवात झाली आहे. मुंबईतील डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न या दोन स्टेडियममध्ये सर्व सामने खेळवले जातील. त्यापूर्वी डी.वाय.पाटील स्टेडियमवर रंगारंग उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी अभिनेत्री क्रिती सेनन, कियारा अडवाणी आणि पॉप सिंगर एपी धिल्लन यांनी परफॉर्म केले

WPL 2023 Opening Ceremony 2023 Live Updates

ट्रॉफीचे अनावरण

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनंतर महिला प्रीमियर लीगच्या सर्व संघांच्या कर्णधारांना मंचावर आमंत्रित केले. गुजरातची कर्णधार बेथ मुनी, मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर, बंगळुरूची कर्णधार स्मृती मानधना, यूपी वॉरियर्सची कर्णधार अॅलिसा हिली आणि दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग मंचावर पोहोचली. यानंतर सर्व कर्णधारांच्या उपस्थितीत ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले.

महिला प्रीमियर लीगला सुरुवात

मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगला धमाकेदार सुरुवात झाली. यावेळी अभिनेत्री कियारा अडवाणी आणि क्रिती सेनन यांनी आपल्या नृत्याने सर्वांची मने जिंकली. दुसरीकडे, प्रसिद्ध पॉप गायक एपी धिल्लनने आपल्या गाण्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले. यानंतर शेवटी बीसीसीआयचे सर्व अधिकारी स्टेजवर पोहोचले. त्यांच्यासोबत पाच संघांचे कर्णधारही पोहोचले. सर्व कर्णधारांनी मिळून ट्रॉफीचे अनावरण केले.

क्रिती-कियारानंतर एपी ढिल्लन स्टेजवर

कियारा अडवाणी आणि क्रिती सॅनननंतर आता एपी ढिल्लन स्टेजवर परफॉर्म करत आहे. त्याने स्वतः गायलेल्या पंजाबी गाण्याने सुरुवात केली.

क्रिती सॅननचा चकदे इंडिया गाण्यावर डान्स

क्रिती सेननने चकदे इंडियामधील 'बादल पे पाँव है' या गाण्याने आपल्या परफॉर्मन्सची सुरुवात केली. त्यानंतर तिने चकदे इंडियाच्या टायटल ट्रॅकवरही डान्स केला. त्यानंतर तिने 'लुका छुपी' चित्रपटातील 'कोका कोला तू' गाण्यावर डान्स केला. यानंतर तिने तिच्या प्रसिद्ध 'परम सुंदरी' गाण्यावर डान्स करून लोकांची मने जिंकली.

कियारा आडवाणीचा भूल भुलैया 2' या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर डान्स

मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. कियारा अडवाणी प्रथम आपला परफॉर्मन्स सादर करणार आहे. कियाराने तिच्या 'क्या बात है' गाण्याने परफॉर्मन्सची सुरुवात केली. तिने तिच्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवरही डान्स केला.

WPL Opening Ceremony Live : उद्घाटन सोहळ्याची तयारी पूर्ण

मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. काही वेळात बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन आणि कियारा अडवाणी परफॉर्म करणार आहेत.

WPL Opening Ceremony Live : काही वेळात सुरू होणार उदघाटन सोहळा

काही वेळातच महिला प्रीमियर लीगचे उद्घाटन होणार आहे. प्रेक्षक हळूहळू स्टेडियममध्ये पोहोचू लागले आहेत.

WPL Opening Ceremony Live : मुंबई इंडियन्सने शेअर केला सराव व्हिडिओ

महिला प्रीमियर लीग २०२३ चा पहिला सामना मुंबई इंडियन्स वुमन आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळवला जाईल. या सामन्यापूर्वी मुंबईने सरावाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. यावर चाहत्यांनी अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

WPL Opening Ceremony Live: हरलीन-जेमिमाने गायलं एपी धिल्लनसोबत गाणं

महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी, हरलीन देओल आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी गायक एपी ढिल्लनसोबत एक गाणे गायले. त्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

 पाच फ्रँचायझींनी खरेदी केले ८७ खेळाडू

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सीझनसाठी खेळाडूंचा लिलाव १३ फेब्रुवारी रोजी झाला. लिलावात उतरलेल्या एकूण ४४८ खेळाडूंपैकी केवळ ८७ खेळाडूंना बोली लागली. त्याच वेळी, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, यूपी वॉरियर्स, गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या ५ फ्रँचायझींनी मिळून त्यांना खरेदी करण्यासाठी ५९.५० कोटी रुपये खर्च केले. गुजरात, दिल्ली आणि बंगळुरूने सर्वाधिक १८-१८ खेळाडू खरेदी केले. तर, मुंबईने १७ तर यूपीने १६ खेळाडूंना खरेदी केले.

WhatsApp channel