मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Duleep Trophy: वेस्ट झोननं १९व्यांदा जिंकली दुलीप ट्रॉफी, अजिंक्य रहाणेच्या संघाने साऊथ झोनला हरवलं

Duleep Trophy: वेस्ट झोननं १९व्यांदा जिंकली दुलीप ट्रॉफी, अजिंक्य रहाणेच्या संघाने साऊथ झोनला हरवलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 25, 2022 01:29 PM IST

West Zone Won Duleep Trophy: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली वेस्ट झोनने (पश्चिम विभाग) दुलीप करंडक स्पर्धा जिंकली आहे. वेस्ट झोनने फायनलमध्ये साऊथ झोनचा (दक्षिण विभाग) २९४ धावांनी पराभव केला.

Duleep Trophy
Duleep Trophy

भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली वेस्ट झोनने (पश्चिम विभाग) दुलीप करंडक स्पर्धा जिंकली आहे. वेस्ट झोनने फायनलमध्ये साऊथ झोनचा (दक्षिण विभाग) २९४ धावांनी पराभव केला. पश्चिम विभागाने पहिल्या डावात २७० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण विभागाने पहिल्या डावात ३२७ धावा केल्या.

त्यानंतर वेस्टने दुसऱ्या डावात ४ बाद ५८५ धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे दक्षिण विभाग संघाला सामना जिंकण्यासाठी ५२९ धावांचे लक्ष्य मिळाले. परंतु दुसऱ्या डावात त्यांना केवळ २३४ धावाच करता आल्या. १९व्यांदा दुलीप करंडक जिंकण्यात पश्चिम विभागाचा संघ यशस्वी ठरला.

पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतर पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात जबरदस्त पुनरागमन केले. चौथ्या दिवशी यशस्वी जैस्वाल (२६५), सर्फराज खान (१२७) आणि हेत पटेल (नाबाद ५१) यांच्या शानदार खेळीच्या बळावर पश्चिम विभागाने दुसरा डाव ४ बाद ५८५ धावांवर घोषित केला. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण विभागाच्या ६ गडी गमावून १५४ धावा झाल्या होत्या. पाचव्या दिवशी संघाला केवळ ८० धावांची भर घालता आली.

साऊथ झोनकडून सलामीवीर रोहन कुन्नम्मलने दुसऱ्या डावात ९३ धावा केल्या. तर रवी तेजाने ९७ चेंडूत ५३ धावा करत थोडीफार झुंज दिली. पश्चिमेकडून शम्स मुलानीने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय जयदेव उनाडकट आणि अतित सेठ यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या